Crime News: दरोडा, जबरी चोरी, घरफोडी व वाहन चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक; 10 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व दोन मोटार सायकल असा एकूण 15,50,000/- रुपयांचा मुद्देमालहस्तगत

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): पुणे ग्रामीण जिल्ह्यातील दरोडा, घरफोडी, जबरी चोरी व चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालणे तसेच दाखल गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, बारामती विभाग, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, पुणे विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी, चैतन्य कदम, बारामती उपविभाग व पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार सदर गुन्ह्यांचा समांतर तपास करीत होते.
दिनांक ०१/११/२०२६ रोजी पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज व त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त (पेट्रोलिंग) करीत असताना, गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांतील संशयित इसम मोबाईल उर्फ हरी पवार, राहुल उर्फ चिल्या मंगेश काळे व महेश उर्फ मावड्या मंगेश काळे हे इंदापूर येथे येणार आहेत.
सदर माहितीच्या आधारे पथकाने पुणे-सोलापूर बायपास रोडवरील जगदंब हॉटेलजवळ सापळा रचला. काही वेळातच मोटार सायकलींवरून तीन इसम तेथे आले. पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी आवश्यक व वाजवी बळाचा वापर करून त्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमांची नावे विचारली असता, आरोपींनी आपले नाव १) मोबाईल उर्फ हरी पवार, (वय २२ वर्षे), रा. सुगाव भोसे, ता. पंढरपूर आणि १ विधिसंघर्षग्रस्त बालक असल्याचे सांगितले. त्यांच्याकडील मोटार सायकलींबाबत विचारपूस केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक चौकशी केली असता सदर मोटार सायकली चोरीच्या असल्याचे निष्पन्न झाले.
त्याबाबत पंढरपूर व करकंब पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. त्यांच्याकडून युनिकॉर्न मोटार सायकल क्रमांक MH-13 EQ-4910 व स्प्लेंडर मोटार सायकल क्रमांक MH-13-DW-2723 जप्त करण्यात आल्या. तसेच दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडकी येथील घरफोडीच्या गुन्ह्यातील चोरीस गेलेला मोबाईल फोन मिळून आला आहे.
तसेच वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात दाखल जबरी चोरीचा गुन्हा देखील पथकाने उघडकीस आणलेला आहे. सदरचा गुन्हा आरोपी नामे शक्तिमान हुबऱ्या काळे, (वय २२ वर्षे), रा. माळेगाव, ता. बारामती, जि. पुणे व १ विधिसंघर्षग्रस्त बालक यांनी केल्याचे निष्पन्न झालेले असून, त्यास अटक करण्यात आली आहे.
सदर आरोपी व विधिसंघर्षग्रस्त बालक यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता, त्यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्यात दरोड्याचा १, जबरी चोरीचा १, घरफोडीचे ८ व सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीचे २ असे एकूण १२ गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
त्यांच्याकडून सुमारे १० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, दोन मोटारसायकल व मोबाईल असा एकूण १५,५०,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत अधिक चौकशी केली असता, त्यांनी खालीलप्रमाणे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे:
१) दौंड पोलिस अधिकारी गु.र.नं. ६६७/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३१०(२)
२) दौंड पोलीस अधिकारी गु.र.नं. ८२४/२०२६, भारतीय न्याय कलम ३०५(अ),३३१(२),३३१(४)
३) इंदापूर पोलीस अधिकारी गु.र.नं. १६५/२०२६, भारतीय न्याय कलम ३०५ (अ), ३३१ (४)
४) इंदापूर पोलीस प्रशासन गु.र.नं. ५५५/२०२५, भारतीय न्याय कलम ३०५ (अ), ३३१(४)
५) इंदापूर पोलीस अधिकारी गु.र.नं. ३४३/२०२५, भारतीय न्याय कलम ३०५ (अ), ३३१(३)
६) वालचंदनगर पोलिस अधिकारी गु.र.नं.३०१/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ), ३३१(३)
७) वालचंदनगर पोलिस अधिकारी गु.र.नं. २५९/२०२६, भा. न्याय सं. कलम ३०५ (अ), ३३१(२), ३३१ (४)
८) वालचंदनगर पोलिस अधिकारी गु.र.नं. ९२/२०२६, भारतीय न्याय कलम ३०५ (अ), ३३१ (४)
९) भिगवण पोलीस ठाणे गु.र.नन. १८२/२०२६, भारतीय न्याय कलम ३०५ (अ), ३३१(३), ३३१ (४)
१०) गाव निंबाळकर पोलीस निवडणूक गु.र.न १८०/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३११ (३३१ (६)
११) करंब पोलीस अधिकारी गु.र.नं.३३३/२०२६, भारतीय संहिता कलम ३०३ (२) (सोलापूर ग्रामीण)
१२) पंढरपूर पोलिस ठाणे गु.र.न. २८२/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) (सोलापूर ग्रामीण)
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल (पुणे ग्रामीण), मा. अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार (बारामती विभाग), अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार (पुणे विभाग), उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम (बारामती उपविभाग) यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर (स्थानिक गुन्हे शाखा), पोलीस निरीक्षक विलास नाळे (इंदापूर पोलीस स्टेशन), वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनकडील सपोनी जीवन मोहिते, पोसई मुलाणी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई सुधीर वाळुंज, पोसई बाळासाहेब कारंडे, पोसई विनोद भोकरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार शिवाजी निकम, किशोर तेलंग, सचिन होळकर, गुलाबराव पाटील, स्वप्निल अहिवळे, पोपट नाळे, शैलेश स्वामी, सुलतान डांगे, तुषार चव्हाण, गणेश डेरे, रहीस मुळानी, राजू मोमीन, अतुल डेरे, चेतन पाटील, भारत मोहोळ, इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार संतोष शिंदे, अंकुश माने, राहुल शिंदे, लक्ष्मण सूर्यवंशी, योगेश कर्चे, विनोद लोखंडे, सचिन नांगरे, आण्णा कोळेकर व वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार पो.हवा. खेडकर, पो.हवा. खांडेकर, पो.हवा. देवकर, पो.कॉ. जाधव, पो.कॉ. यादव, पो.कॉ. धात्रे, पो.कॉ. भोसले, पो.कॉ. परगे, पो.कॉ. येताळे यांनी केली असून, गुन्ह्याचा पुढील तपास दौंड पोलीस स्टेशन करीत आहे.



