क्राईम

Crime News: गावठी पिस्टल सोबत बाळगणारा मोक्यातील सराईत आरोपी पोलीसांचे ताब्यात: सासवड पोलीस स्टेशनच्या गुन्हेशोध पथकाची दमदार कामगीरी

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज) : दिनांक ०७/१०/२०२६ रोजी पोनि संतोष घोळवे व गुन्हे शोध पथक पोलीस स्टेशन हदिदत गस्त करीत असताना गोपणीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, “मौजे सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे गावचे हद्दीतील सैनिक कॅन्टिनचे पाठीमागे ता पुरंदर जिल्हा पुणे. येथे एक इसम त्याचे ताब्यातील काळया रंगाचे स्प्लेंडर मोटारसायकल तिचा आरटीओ नं. एम. एच १२ टीएल ८७९६ सोबत रोडचे बाजुला बसला आहे. अशी माहीती मिळाल्याने सपोनि शंकर राऊत व गुन्हे प्रकटिकरण पथकासह सदर ठिकाणी गेलो असता काळे रंगाचे मोटारसायकलवर एक इसम बसल्याचे दिसुन आला. त्याचेकडे चौकशी केली असता तो आपले नाव पत्ता सांगत नसल्याने त्याचेवर अधिक संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरिक्षक शंकर राउत यांनी त्याचेकडे कसुन चौकशी केली असता त्याने त्याचे नाव रोहीत राजु माने, वय २४ वर्षे, रा. गुजरवाडी, दत्तनगर, निंबाळकरवस्ती, कात्रज, पुणे असे असल्याचे सांगीतले. तसेच त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे जवळील मोटारसायकलचे स्टुल बॉक्स ड्रॉव्हरमध्ये पिस्टल असल्याचे सांगीतले. त्यावेळी सपोनि राऊत यांनी दोन पंचांना हिवरे रोडचे सैनिक कॅन्टीचे पाठीमागे शेरे येथे बोलावुन पंचांची ओळख करून देवुन त्यांना सर्व माहिती समजावुन सांगुन त्यांचेसमक्ष टुल बॉक्स खोलला असता त्यामध्ये एक स्टीलचे गावठी बनावटीचे पिस्टल ठेवल्याचे दिसुन आल्याने ते दोन पंचासमक्ष जप्त करून त्याच्या जवळ मिळुन आलेल्या मो/सा सह पोलीस ठाणेस येवुन नमुद इसमाविरोधात सासवड पोलीस स्टेशन गु.र.क ४९२/२०२६ शस्त्र अधिनियम ३,२५ सह कलम महाराष्ट्र पोलिस अधिनीयम १९५१ चे कलम ३७(१) (३), १३५ प्रमणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर आरोपीस अटक करण्यात आली आहे.

आरोपी कडुन ताब्यात घेण्यात आलेल्या मुददेमालाचे वर्णण खालीलप्रमाणे :-

१) च्या, को/- एक स्टीलचे लोखंडी बॉडीचे गावठी पिस्टल, त्याचे बॅरलची लांबी १५.५ से.मी. असुन व्यास ८ मिमि, पिस्टलला ट्रिगर व मुठीवर दोन्ही बाजुने काळे रंगाची प्लॅस्टीक पट्टी स्कुचे सहायाने फिट केलेली. जु.वा.कि.अं.

२) १०००/- किंमचीचे एक स्टीलचे मॅगझीन जु.वा.किं.अं.

३) उत्कृष्ट,को/- रू. किंमतीची एक काळे रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल तीचे पाठीमागील नंबर प्लेटवर महाकाल असे लिहीलेले व पुढील नंबर प्लेट वर आरटीओ नं. एम.एच १२ टीएल ८७९६ अस असलेली मोटारसायकल जु. वा. किं. अ. ९६,०००/-

अटक आरोपीवरिल गुन्हे अभिलेख खालील प्रमाणे /-

१) लोणीकंद पोलीस स्टेशन गु.र. क ३५१/२०२३ कलम ३९४,३४ भा.द.वी सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनीयम सन १९९९ चे कलम ३ (१),३(२), ३(४)

२) कोंढवा पोलिस स्टेशन गु.र.क ४४१/२०२३ कलम ४५७, ३८०,३४ भा.द.वी

३) खडक पोलिस स्टेशन गु.र.क २३२/२०२२ कलम ३७९ भा.द.वी

४) वाघोली पोलिस स्टेशन गु.र. क ६१२/२०२६ कलम ३,२५ शस्त्रास्त्र अधिनियम सह कलम महाराष्ट्र पोलीस अधिनीयम १९५१ चे कलम ३७ (१) (३),१३५ प्रमणे

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक पुणे ग्रामिण संदीपसीह गिल्ल, अप्पर पोलीस अधिक्षक बारामती विभाग गणेश बिरादार, अप्पर पोलीस अधिक्षक पुणे विभाग शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग राजेंद्रसिह गौर, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांचे मार्गदर्शना खाली सासवड पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक शंकर राउत, पोसई परमेश्वर गोडसे, पोलीस हवालदार/२२४२ दत्तात्रय काळे, पोहवा/जाधव, पोना/२३२९ गोकुळ हिप्परकर, पो कॉ/४३४ तुषार लोंढे., पो.कॉ/१७१४ प्रविण शेंडे, यांचे पथकाने केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक शंकर राउत हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button