News: जेजुरी: मर्दानी दसरा खंडा स्पर्धेत खंडा तोलणे व खंडा कसरत मध्ये यांनी पटकवली प्रथम क्रमांकाची पारितोषिके

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या तीर्थक्षेत्र जेजुरीच्या मर्दानी दसरा उत्सव मोठया उत्साहात साजरा झाला. तब्बल 18 तास चाललेल्या या मर्दानी दसऱ्याची सांगता खंडा (तलवार) स्पर्धेने झाली. दसऱ्याच्या सांगता समारंभाच्या वेळी मर्दानी खेळाची चित्तथरारक प्रात्यक्षिके पाहून जेजुरीचा मर्दानी दसरा हा खरेच मर्दानी असल्याची अनुभूती येते.
रात्री 2.30 वाजता पालखी सोहळ्याची भेटा भेट झाल्यानंतर ग्राम प्रदक्षिणा पूर्ण करीत पालखी महाद्वारा मार्गे श्री खंडोबा मंदिर गडकोटात आज सकाळी 7 वाजता पोहोचली. सालाबाद प्रमाणे ऐतिहासिक खंडा तोलणे व कसरत स्पर्धा संपन्न झाल्या. खांदेकरी, मानकरी, पुजारी सेवेकरी यांचे सन्मान करण्यात आले. विजेत्या स्पर्धकांना रक्कम व आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
खंडा तोलणे –
१) अंकुश सुदाम गोडसे (१४ मि.०५ सेकंद)
२) अमोल राजू खोमणे (११ मि. ०१ सेकंद)
३) हेमंत’ हरिभाऊ माने (०६ मि. १७ सेकंद)
४) मंगेश अनंता चव्हाण (०५ मि. ५९ सेकंद )
५) कुणाल बापू खोमणे (०५ मि. ५९ सेकंद)
६) सुहास काळूराम खोमणे (०५ मि. ४६ सेकंद)
७) गिरिष राजेंद्र घाडगे (०५ मि. ३४ सेकंद)

खंडा कसरत –
१) नितीन कुदळे , २) अक्षय गोडसे, ३) शिवम कुदळे, ४) शिवा राणे, ५) विशाल माने, ६) सचिन कुदळे, ७) सौरभ सकट
दोन्ही स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक 51000/- रु., द्वितीय क्रमांक 35000/- रु., तृतीय क्रमांक 25000/- रु., चतुर्थ क्रमांक 20000/- रु., पाचवा क्रमांक 10000/- रु. आणि उत्तेजनार्थ 5000/- रुपये रक्कम व आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानचिन्ह देण्यात आले.
‘विशेष खंडा कसरत स्पर्धा विजेता’ – शुभम कारकूड – 151 वेळा तलवार मुग्दल प्रमाणे फिरविणे. 5000/- रुपये
या स्पर्धेचे पंच म्हणून सुधीर गोडसे, जालिंदर खोमणे, कृष्णा कुदळे, सोमनाथ उबाळे, बाळासो काळे यांनी नियोजन केले. विश्वस्त यांचे हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ, मानकरी, खांदेकरी, सेवेकरी, पत्रकार आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंच सूचना – पुढील वर्षी खंडा स्पर्धेसाठी दोन दिवस आधी स्पर्धा परीक्षा घेण्यात येईल जो स्पर्धक 3 मिनिटे खंडा तोलवून धरू शकतो त्याच स्पर्धकाला स्पर्धेत सहभाग घेता येईल याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी असे आवाहन पंचाकडून करण्यात आले आहे.



