Crime News: चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी अटक, त्याचेकडुन 06 गुन्हे उघडकीस आणून 55 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व मोटर सायकल असा एकूण 9,00,000/- रु किं. चा मुद्देमाल हस्तगत

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): दौंड पोलीस स्टेशन हद्दित दाखल झालेल्या जबरी चोरी घटणेच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल साो, पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखा पथकाची बैठक घेवुन मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याकरीता सूचना दिल्या. त्या अनुषंगाने तपास सुरू करुन तपास पथकाने मालमत्तेच्या गुन्हयाबाबत गुन्हे घडलेली ठिकाणे, गुन्हयांची वेळ, गुन्हयांची कार्यपद्धती याचा आढावा घेण्यात आला. तसेच गुन्हे कार्यपद्धती साम्य असलेल्या काही घटनांची माहिती एकत्रित करुन गोपनीय माहितीच्या आधारे चैन स्नॅचींग करणारे इसम नामे १) दिपक बलभीम पवार (वय २८ वर्षे) रा. आरोळे वस्ती ता. जामखेड जि. अहिल्यानगर २) युवराज सचिन लोखंडे (वय २४ वर्षे) रा. उध्दट ता. इंदापूर जि.पुणे यांनी सदरचा केला असले बाबत माहिती मिळाल्याने व ते दोघे आरोळे वस्ती जामखेड परिसरात राहत असल्याबाबत समजल्याने पथकाने सदर ठिकाणी जाऊन त्यांचा शोध घेऊन आरोपी नामे १) दिपक बलभीम पवार (वय २८ वर्षे) रा. आरोळे वस्ती ता. जामखेड जि. अहिल्यानगर २) युवराज सचिन लोखंडे (वय २४ वर्षे) रा. उध्दट ता. इंदापूर जि.पुणे यांना जामखेड येथुन ताब्यात घेतले त्यांच्याकडे गुन्हयाबाबत चौकशी केली असताना त्यांनी १) दौंड पोलीस स्टेशन गु.र. नं ६७२/२०२६ BNS ३०४(२), ३(५), २) दौड पोलीस स्टेशन गु.र.नं ६३२/२०२६ BNS ३०४ (२), ३ (५), ३) यवत पोलीस स्टेशन गु.र.नं ९६४/२०२६ BNS ३०४(२), ३(५), ४) यवत पोलीस स्टेशन गु.र.नं ९३०/२०२६ BNS ३०३(२), ५) वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.नं १६३/२०२६ BNS ३०४(२), ३ (५), ६) जेजुरी पोलीस स्टेशन २०५/२०२६ BNS ३०४ (२), ३ (५), असे गुन्हे केल्याची कबुली दिली असून आरोपी कडुन सुमारे ५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व मोटर सायकल असा एकुण ९,००,००० /- रू. किं.चा मुद्देमाल हस्तगत करणेत आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, साो. पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, बारामती विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी बापुसाहेब धडस, दौंड उपविभाग, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, प्रमोद क्षीरसागर, स्थानिक गुन्हे शाखा, दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे, स्था.गु.शा. चे पोसई ज्ञानेश्वर राऊत, दौड पोलीस स्टेशनचे पोसई शंकर वाघमारे, स्था.गु.शा.चे पोलीस अंमलदार सचिन घाडगे, आसिफ शोख, गुरुनाथ गायकवाड, सुभाष राऊत, राजु मोमीन, विकास कापरे, भारत मोहोळ, चेतन पाटील, दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार अंतुल पठाण, अंकुश दळवी यांनी केली असून गुन्हयाचा पुढील तपास दौंड पोलीस स्टेशन करत आहे.



