आपला जिल्हा

News: जेजुरीच्या मर्दानी दसरा महोत्सवानिमित्त ‘रमणा’ डोंगर परिसरात भव्य स्वच्छता मोहीम;​देवसंस्थानचा स्तुत्य उपक्रम

​प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): खंडोबाची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या जेजुरीत ऐतिहासिक आणि परंपरेने चालत आलेल्या ‘मर्दानी दसरा’ उत्सवाची धूम पाहायला मिळाली. या उत्सवाच्या निमित्ताने निघणारा पालखी सोहळा जयाद्री डोंगररांगेतील रमणा परिसराजवळ ‘भेटाभेट’ सोहळ्यासाठी जात असतो. या ऐतिहासिक सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी खांदेकरी, मानकरी, पुजारी, सेवेकरी, ग्रामस्थ आणि लांबून आलेले हजारो भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

​उत्सवादरम्यान सहभागी झालेल्या भाविकांसाठी महाप्रसादाची विशेष सोय करण्यात आली होती, तर रात्री रंगलेल्या दिमाखदार भेटाभेट सोहळ्यात आकर्षक फटाक्यांची आतषबाजी लक्षवेधी ठरली. या सोहळ्यात हजारो भाविकांची तुडुंब गर्दी जमली होती.

​पर्यावरण संवर्धनासाठी उचलले पाऊल – मोठ्या जनसमुदामुळं रमणा डोंगर परिसरात प्लास्टिक पिशव्या, कागदी व प्लास्टिक द्रोण-पत्रावळी आणि इतर कचरा येथील झाडाझुडपांमध्ये मोठ्या प्रमाणात जमा झाला होता. या कचऱ्यामुळे परिसरातील वन्यजीव, पाखरे आणि निसर्गरम्य झाडे-झुडपांना होणारा त्रास टाळण्यासाठी जेजुरी देवसंस्थानच्या वतीने तातडीने पावले उचलण्यात आली.

​उत्सव संपताच देवसंस्थानच्या पुढाकाराने रमणा डोंगर परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत परिसरातील संपूर्ण कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. देवसंस्थानच्या या पर्यावरणपूरक आणि संवेदनशील उपक्रमाबद्दल जेजुरीकर ग्रामस्थ आणि निसर्गप्रेमींकडून समाधान व्यक्त होत असून, सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button