क्राईम

Crime News: अखेर डाळिंब येथील खुनाच्या गुन्हयाची उकल, आरोपी जेरबंद

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): दि. ०३/१०/२०२६ रोजी सायं. ०६:०० वा. च्या सुमारास मौजे डाळिंब ता. दौंड जि. पुणे गावाचे हदिदतील महिला नामे नंदा धोंडीबा खंडागळे, (वय ५१ वर्षे), व्यवसाय मजुरी रा. डाळींब ता. दौंड जि. पुणे यांचे राहते घरातून त्यांचा मुलगा नामे भिमाशंकर धोंडीबा खंडागळे, (वय ३५ वर्षे), रा. डाळिंब ता. दौंड जि. पुणे यास कोणीतरी अज्ञात कारणांसाठी अपहरण केल्याबाबत यवत पोलीस स्टेशन गु.रजि. नं. १०१२/२०२६ भा.न्या.सं. कलम १४० (३) अन्वये तक्रार दिलेली होती. सदर गुन्हयाचा तपास सुरू असताना दि. ०८/१०/२०२६ रोजी मौजे डाळिंब ता. दौंड जि. पुणे गावच्या हदिदत रमेश म्हस्के यांचे विहिरीत फिर्यादी यांचा मुलगा भिमाशंकर धोंडीबा खंडागळे याचा मृतदेह मिळून आला. त्यावेळी भिमाशंकर खंडागळे यास कोणीतरी अज्ञात इसमाने, अज्ञात कारणासाठी पुरावा नष्ट करण्याच्या उददेशाने त्याचे हातपाय लोखंडी तारेने बांधून व मृतदेहास मोठा दगड बांधून विहिरीत फेकून खून केला असल्याचे निषन्न झाले. त्यानंतर सदर गुन्हयात भा. न्या. सं. कलम १०३ (१), २३८ अशी कलमवाढ करून त्याअनुषंगाने अधिक तपास सुरू केला.

दि.१५/१०/२०२६ रोजी गुन्हयाचे तपासादरम्यान संशयित इसम विजय सुभाष लेचरूड, (वय ४० वर्षे), रा. डाळिंब ता. दौंड जि. पुणे यास ताब्यात घेवून गुन्हयाचे अनुषंगाने अधिक विचारपूस केली असता इसम नामे भिमाशंकर धोंडीबा खंडागळे, (वय ३५ वर्षे), रा. डाळिंब ता. दौंड जि. पुणे याने त्यास किरकोळ शिवीगाळ केल्याने त्याचा राग मनात धरून त्याने भिमाशंकर याचा गळा दाबून खून केला. त्यानंतर भिमाशंकर याचे हात-पाय लोखंडी तारेने बांधून त्याच्या मृतदेहास मोठा दगड बांधून पुरावा नष्ट करण्याच्या उददेशाने विहिरीत फेकून दिले असल्याची कबुली दिली. त्यावेळी आरोपी विजय सुभाष लेचरूड, (वय ४० वर्षे), रा. डाळिंब ता. दौंड जि. पुणे यास गुन्हयाचे तपासकामी अटक करण्यात आलेली असून सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षय मोरे करित आहेत.

सदरची कामगिरी ही पोलीस अधिक्षक संदिपसिंह गिल, अपर पोलीस अधिक्षक पुणे विभाग डॉ. शुभम कुमार, अपर पोलीस अधिक्षक बारामती विभाग गणेश बिरादार व उपविभागीय पोलीस अधिकारी, दौंड बापुराव दडम यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक प्रमोद क्षिरसागर, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर, महा. पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड, पोलीस उपनिरीक्षक अक्षय मोरे, पोलीस उपनिरीक्षक दशरथ नंदीवाले, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राउत (स्था.गु.शा.) पोलीस उपनिरीक्षक बाळासो थिकोळे, पो.हवा. संदीप देवकर, पो. हवा. सुहास देवकाते, पो.कॉ. मारूती बाराते, पो. कॉ. प्रतिक जगताप, पो.कॉ. धिरज जाधव, पो. कॉ. अमोल भुजबळ, पो. कॉ. सचिन गुंड, पो.कॉ. प्रतिक गरूड, पो.कॉ. विनीत कु-हाडे, पो.कॉ. दिनेश लोणकर, सफी. सचिन घाडगे (स्था.गु.शा.), सफौ. आसिफ शेख (स्था.गु.शा.), पो. हवा. गुरूनाथ गायकवाड (स्था.गु.शा.), पो. हवा. सुभाष राउत (स्था.गु.शा.), पो.हवा. विकास कापरे (ग्था.गु.शा.) यांचे पथकाने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button