Uncategorized

News: दुष्काळग्रस्त तालुक्यांतील 12 प्रकारच्या सवलती व उपाययोजनांचा आढावा

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या दहा तालुक्यांमध्ये शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या १२ प्रकारच्या सवलती व उपाययोजनांच्या अंमलबजावणीचे नियोजन निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतलेल्या बैठकीत आढावा घेतला.

दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी जमीन महसुलात सूट, पीककर्जाचे पुनर्गठन, कृषिपंपांच्या वीजबिलाबाबत सवलती, विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करणे, रोजगार उपलब्धता, टँकरद्वारे पाणीपुरवठा, चारा उपलब्धता तसेच पिण्याच्या पाण्याचे नियोजन आदी उपाययोजनांच्या अंमलबजावणीचा यावेळी आढावा घेण्यात आला.

संबंधित तालुक्यांतील अधिकाऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीचा विचार करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या सवलती व उपाययोजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी आवश्यक नियोजन करावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button