Uncategorized

News: केंद्र प्रमुख विभागीय परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांना ऑनलाईन माहिती सादर करण्यास मुदतवाढ

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): केंद्र प्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण उमेदवार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेत (सीटीईटी) उत्तीर्ण झाले असल्यास त्याबाबतची माहिती ऑनलाईन लिंकमध्ये भरण्यास ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

राज्यातील सर्व जिल्हा परिषद मधील कार्यरत शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी घेण्यात आलेल्या ‘समुह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५’ या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये उत्तीर्ण शिक्षकांनी टीईटी किंवा सीटीईटी उत्तीर्ण असल्याबाबतची माहिती https://mscepune.in/dtedola/KP2026Info.aspx या लिंकमध्ये भरावयाची आहे, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button