Uncategorized

Crime News: महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्यांमध्ये घरफोडी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीस अटक करुन 03 गुन्हे उघडकीस आणून सुमारे 16 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण 24,30,000/- रु किं.चा मुद्देमाल हस्तगत

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज) : शिक्रापुर, शिरुर पोलीस स्टेशन हद्दितील घरफोड चोरीच्या घटणेच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल साो, पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखा व उप विभागातील पोलीस स्टेशनचे तपास पथकांची बैठक घेवून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याकरीता मागदर्शन करून सूचना दिल्या. त्या अनुषंगाने तपास सुरू करुन तपास पथकाने मालमत्तेच्या गुन्हयाबाबत गुन्हे घडलेली ठिकाणे, गुन्हयांची वेळ, गुन्हयांची कार्यपद्धती याचा आढावा घेतला. गुन्हे कार्यपद्धती साम्य असलेल्या काही घटनांची माहिती एकत्रित करणेत आली. तांत्रिक विश्लेषणासाठी विशेष पथक नियुक्त केले. गुन्हे कार्यपद्धतीची माहिती घेवून गोपनीय बातमीदारांना माहिती पुरविणेत आली होती. घटनास्थळापासून रस्त्यालगत असणारे सीसीटीव्ही कॅमेरे चेक करणेत आले, फुटेज मधील उपलब्ध माहितीचे आधारे व तांत्रिक विश्लेषणातून मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सदरची घरफोडी करणारे इसम हा मौजे. कविठा ता. आचलपूर जि. अमरावती येथे त्याच्या बहिणीकडे राहत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेची पथक व शिक्रापुर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार यांना मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने मौजे. कविठा ता. आचलपूर जि. अमरावती भागात जाऊन इसम नामे दिपक भिमराव दांडगे (वय २५ वर्षे) रा.घुग्री ता. भैसदेही जि. बैतुल सध्या रा. कविटा ता.आचलपूर जि. अमरावती यांना चौकशीकामी ताब्यात घेऊन त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी शिक्रापूर, शिरूर परिसरात चोरी केल्याचे कबुल केल्याने नमुद आरोपी दिपक भिमराव दांडगे (वय २५ वर्षे) रा. घुग्री ता. भैसदेही जि. बैतुल सध्या रा. कविठा ता. आचलपूर जि. अमरावती यास ताब्यात घेण्यात आले. त्याचेकडे चौकशी करता त्याने १) शिक्रापुर पो स्टे. गु.र.नं. ६६९/२०२६, भा.न्या.सं.क. ३३१(३), ३०५ (ए), २) शिक्रापुर पो स्टे. गु.र.नं. ६७०/२०२६, भा.न्या.सं.क. ३३१(३), ३०५ (ए), व ३) शिरुर पो स्टे गु.र.नं. ७०८/२०२६ भा.न्या.सं.क. ३३१(३), ३०५ (ए), प्रमाणे गुन्हे केल्याचे कबुल केले असुन पुढील तपास कामी शिक्रापूर पोलीस स्टेशनकडील गु.र.नं. ६६९/२०२६ मध्ये अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाच्या तपासामध्ये आरोपीकडुन चोरीकेलेले सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलेले असुन आरोपी कडुन सुमारे १६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व मोटार सायकल असा एकुण २४,३०,०००/- रू. किं. चे हस्तगत करण्यात आले आहे. सदर सराईत आरोपी विरुध्द यापुर्वी महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्यांमध्ये एकुण १४ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपीस मा. न्यायालयात हजर करणेत आले असुन आरोपी सध्या शिक्रापुर पोलीस कोठडी रिमांड मध्ये आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, पुणे विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भासले, शिरूर उपविभाग, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, प्रमोद क्षीरसागर, स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक, चंद्रशेखर यादव, शिक्रापूर पोलीस स्टेशन, सपोनि राहुल देशमुख, शिक्रापुर पोलीस स्टेशन व स्था.गु.शा.चे पोसई महेश डोंगरे, सफौ संजय पड्याळ, पोहवा तुषार पंदारे, पोहवा जनार्दन शेळके, पोहवा/संजू जाधव, पोहवा/राजु मोमीन, पोहवा/विकास पाटील, पोकॉ सागर धुमाळ व शिक्रापुर पो स्टे कडील पोसई उमाकांत कुंजीर, पोलीस अंमलदार सहा फौजदार धनंजय थेऊरकर, पोहवा/अमोल दांडगे, पोहवा/शिवाजी चितारे, पोहवा/रोहिदास पारखे, पोहवा/अमोल नलगे, पोकॉ/मच्छिद्र निचित, पोकॉ/नारायण वाळके, पोकॉ राम जाधव, पोकों/भारत भोसले पोअंल/अस्मिता जोंधळे यांनी केली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास शिक्रापुर पोलीस स्टेशन करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button