क्राईम

Crime News: जेजुरी सोमवती यात्रे दरम्यान 10 सराईत गुन्हेगारावर प्रतिबंधात्मक कारवाई; जामीनदार न दिल्याने येरवडा कारागृहात रवाना

प्रतिनिधी(महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 09/11/2026 रोजी सोमवती यात्रा असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, भाविकांच्या गर्दीमध्ये लोकांचे दागिने पैसे चोरणाऱ्या संशयीतावर जेजुरी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.

पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल,अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग राजेंद्र सिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलीस ठाणे कडील अधिकारी व अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांच्याकडील अधिकारी व अंमलदार यांचे पथकाने संशयितरित्या मिळून आलेल्या 10 संशयित इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवी ची उत्तरे दिली तसेच त्यांच्याकडे कोणतेही ओळखीचा पुरावा मिळून आला नाही. ते देवदर्शनासाठी आलेले नसून चोरी करण्याच्या उद्देशाने आलेले होत.सदर इसमांचा पूर्व इतिहास पाहता त्यांच्यावर बीड जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस ठाणे मध्ये सदर इसमांवर गुन्हे चोरीचे, शरीराविरुद्धचे अन्य प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे माहिती मिळाली. सदर इसम हे गुन्हे करण्याच्या उद्देशाने चोरीच्या उद्देशानेच सोमवारी सोमवती यात्रेच्या गर्दीत आले असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांच्याकडून भाविकांचे लोकांच्या बाबतीत होणारे गुन्हे रोखण्यासाठी सदर इसमांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, पुणे ग्रामीण यांच्यासमोर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 128 अन्वये प्रतिबंधक कारवाई प्रस्ताव सह हजर ठेवण्यात आले.

विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अप्पर पोलीस अधीक्षक बारामती पुणे ग्रामीण यांनी त्यांना योग्य व लायक जामीनदार / हमीदार हजर करण्याबाबत मुदत दिली असता, त्यांनी त्या मुदतीत जामीनदार हजर केला नाही. त्यामुळे विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अप्पर पोलीस अधीक्षक बारामती पुणे ग्रामीण यांच्या आदेशान्वये त्यांना कलम 129(3), 141 भा.ना.सु.स. नुसार वॉरंटसह जिल्हा मध्यवर्ती कारागृह, येरवडा, पुणे येथे जमा करण्यात आले आहे.

कारवाई केलेले इसम

  1. ज्ञानेश्वर मधुकर जाधव, (वय 43 वर्षे), 2. शकील जमील शेख, (वय 25 वर्षे), 3. रमेश शंकर जाधव, (वय 56 वर्षे), 4. सुनिल पोपट गायकवाड, (वय 34 वर्षे), 5. परमेश्वर ईश्वर धनवे, (वय 35 वर्षे), 6. दिपक मारुती जाधव, (वय 34 वर्षे), 7. अविनाश अशोक कुसळकर, (वय 23 वर्षे), 8. अशोक शेकू जाधव, (वय 65 वर्षे), 9. विकास भारत गायकवाड, (वय 29 वर्षे), 10. गणेश यल्लामाई, (वय 40 वर्षे) सर्व राहणार गांधीनगर बीड, जिल्हा बीड

यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व गुन्हे प्रतिबंध करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडून अशा कारवाया यापुढेही सुरू राहतील, असे आवाहन पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील जेजुरी पोलीस ठाणे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button