Crime News: इलेक्ट्रोनिक दुकान व कापड दुकान फोडुन चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करून एकुण 2,93,500/- रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): फिर्यादी निखील शिवशंकर दुरगाडे रा. सासवड, मोरया रेसिडेंन्सी ता. पुरंदर, जि. पुणे यांनी फिर्याद दिली की, दिनांक ०७/११/२०२६ रोजी रात्री ११ / ३० वा. ते दिनांक ०८/११ / २०२६ रोजी पहाटे ०४/३० वा. चे दरम्यान मौजे रिलायन्स पेट्रोलपंप शेजारी सासवड ता. पुरंदर, जि. पुणे येथील रूद्र इलेक्ट्रीकल शॉपचे शटर उघडुन आत प्रवेश करून ६५,०००/- रू. किंमतीची कॉपर वायर व रोख रक्कम ५०००/- तसेच सासवड येथील तेजस चौरे यांचे आयकॉन लेवल कपडयाचे दुकानातील एकुण ५५,०००/- रू. किंमतीचे वेगवेगळया कंपनीचे शर्ट असे चोरीस गेलेबाबत सासवड पोलीस स्टेशन येथे तकार दिली होती. त्यानुसार दिनांक ०८/११/२०२६ रोजी सासवड पोलीस स्टेशन गु. र. नं. ५५८ / २०२६ भारतीय न्याय संहीता कलम ३३१ (४), ३०५, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे अनुषंगाने सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांचे आदेशाने गुन्हे शोध पथकातील अधिकारी सपोनि राऊत व अंमलदार यांना योग्य मार्गदर्शन करून दाखल गुन्हयातील गुन्हे कार्यपद्धती, घटनेची वेळ, घटणेचे ठिकाण याबाबत योग्य ती माहीती घेवुन गुन्हयातील आरोपींचा शोध घ्यावा व गुन्हा उघडकिस आणुन आरोपीस अटक करून चोरीस गेले मालाचा तपास करावा असे आदेश दिले.
सासवड पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने तपास करून घटनास्थळी भेट दिली. फिर्यादी यांचेशी संवाद साधुन गुन्हयाचे कार्यपद्धतीची तसेच सदर दुकानातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्यानुसार पुढील सीसीटीव्ही फुटेज चेक करत आरोपींचा मागोवा घेतला, गोपणीय बातमीदार व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे व तांत्रिक तपास करून एका संशयीतास ताब्यात घेवुन त्यास त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव राहुल यम्नाप्पा गायकवाड, (वय २६ वर्षे), रा. डी. वाय. पाटील कॉलेज, निंबाळकरनगर, लेन नं. ८ लोहगाव पुणे असे असल्याचे सांगीतले. त्याचेकडे पोलीस स्टेशन येथे आणुन त्यास विश्वासात घेवुन गुन्हयासंबंधाने विचारपुस केली असता सदर आरोपीने गुन्हा केल्याचे कबुल केले. तसेच सदर गुन्हयातील चोरलेला माल हा सासवड हद्दीत वाघडोंगर येथे झुडपात लपवुन ठेवल्याचे सांगीतले. सदर मुद्देमाल आरोपीकडुन जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल खालीलप्रमाणे
१) ३८५००/- रू. किंमतीचे ३८.५ किलो वजनाची कॉपर वायर जाळुन तयार केलेल्या तांब्याच्या तारांचा बंडल जु. वा. किं. अं.
२) ५५,०००/- रू किंमतीचे वेगवेगळया कंपनीचे शर्ट व ०३ बॉडीस्प्रे जु. वा. किं. अं.
३) २, ००, ०००/- रू. किंमतीची एक पिवळे काळे रंगाची टीव्हीएस कंपनीची रिक्षा तीचा आरटीओ नं. एम.एच. १४ जी. सी. २९७६ असा असलेली जु. वा. किं. अं. २,९३,५००/- एकुण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार गणेश सोनवणे करीत आहेत.
सदर आरोपी राहुल यम्नाप्पा गायकवाड, (वय २६ वर्षे), रा. डी. वाय. पाटील कॉलेज, निंबाळकरनगर, लेन नं. ८ लोहगाव पुणे याचेवर यापुर्वी दाखल असलेले गुन्हे
१) विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर:- गु, र. नं. ५२५/२०२० भा. दं. वि. कलम ३७९
२) विश्रांतवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर:- गु. र. नं. ४३१ / २०२० भा. दं. वि. कलम ३७९
३) भोसरी पोलीस स्टेशन पुणे शहर गु. र. नं. ४२३ / २०२० भा. दं. वि. कलम ३७९
४) विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर:- गु. र. नं. ६५/२०२० भा. दं. वि. कलम ३२४, ३२३, ३४
सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक, संदिपसिंह गील, अपर पोलीस अधिक्षक सो, शुभम कुमार, अपर पोलीस अधिक्षक, बारामती विभाग गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन संतोष घोळवे, यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक शंकर राऊत, पोलीस हवालदार गणेश सोनवणे, पोलीस हवालदार दत्तात्रय काळे, गोकुळ हिप्परकर, पोलीस कॉन्स्टेबल तुषार लोंढे, प्रविण शेंडे, प्रणय मखरे, पारडे, किरण तुपे यांचे पथकाने केली आहे.



