Crime News: सासवड: चांबळी येथील वृद्ध महीलेचे चोरीस गेलेले अडीज तोळे सोन्याचे दागीने तसेच रोख रक्कम हस्तगत करून आरोपीस अटक

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): दिनांक ०८/१०/२०२६ रोजी चांबळी ता. पुरंदर जि. पुणे येथून २.५ तोळे वजनाचे सोन्याचे दागीने व ९,५००/- रू रोख रक्कम चोरीस गेले बाबत स्वप्निल लक्ष्मण कनसे रा. चांबळी ता. पुरंदर जि.पुणे यांनी रोहीत पोपट काटे याचे विरोधात सासवड पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती.
सदर बाबत गुन्हा नोद झाल्यानंतर पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन संतोष घोळवे यांनी तपास पथकांना योग्य मार्गदशन करून दाखल गुन्हयातील गुन्हे कार्यपद्धती, घटणेचा वेळ, घटणेचे ठिकाण याबाबत योग्य ती माहिती घेवुन गुन्हयातील आरोपींचा शोध घेणेकामी सासवड पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटिकरण पथकाचे सपोनि शंकर राउत व पथक आरोपीचा शोध घेणेकरीता रवाना रवाना केले.
सासवड पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने तपास करून घटनास्थळी भेट दिली. फिर्यादी यांचेशी संवाद साधुन गुन्हयाचे कार्यपद्धतीची, आरोपींची माहिती घेतली. सदर आरोपीस ताब्यात घेवुन त्याला नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव रोहित पोपट काटे (वय ३२ वर्षे) रा. पलुस ता. पलुस जि. सांगली असल्याचे सांगीतले त्याचेकडे गुन्हयाचे अनुशंगाने चौकशी केली असता आरोपीने उडवाडवीची उत्तरे दिली. त्यास ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन येथे आणुन त्याला विश्वासात घेवुन अधिक चौकशी केली असता सदर आरोपीने गुन्हा केल्याचे कबुल केले. आरोपीने सोन्याचे दागीने हे चांबळी येथे राहत असलेल्या घराचे जवळ गाडीचे पाठीमागे पुरून ठेवल्याचे सांगीतले. ते दागीने जप्त करण्यात आले आहेत. सदर आरोपीस गुन्हयाचे अनुशंगाने अटक करण्यात आले आहे. सदर गुन्हयाचे अनुशंगाने आरोपीकडे अधिकाचा तपास करीत आहोत.
सदर आरोपीवर यापुर्वी दाखल असेलेल गुन्हे
१) पलुस पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ९ / २०२० भादवी कलम ३२६, ३२४, ५०४,५०६, ३४
सदरच कामगीरी संदिपसिंह गील पोलीस अधिक्षक पुणे ग्रामिण, गणेश बिरादार, अप्पर पोलीस अधिक्षक, बारामती विभाग, बारामती, शुभम कुमार, अप्पर पोलीस अधिक्षक, पुणे विभाग, राजेंद्रसिंह गौर, उपविभागीय पोलीस अधिकारी, भोर विभाग सासवड, संतोष घोळवे, पोलीस निरीक्षक, सासवड पोलीस स्टेशन, यांचे मार्गदर्शनखाली सहायक पोलीस निरीक्षक शंकर राऊत, सहायक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे, पोलीस हवालदार दत्तात्रय काळे, पोलीस हवालदार गणेश सोनवणे, पोलीस अंमलदार तुषार लोंढे, पोलीस अंमलदार प्रविण शेंडे, पोलीस अंमलदार प्रणय मखरे पोलीस अंमलदार पारडे यांचे पथकाने केली.



