Crime News: जेजुरी-मोरगाव रोडला पिकअप आणि मोटार सायकलचा अपघात; एक जणांचा जागीच मृत्यू

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील जेजुरी – मोरगाव रोडला पिकअप आणि मोटार सायकलचा अपघात होऊन एक जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्याबाबत फिर्यादी सुहास रामदास जगताप (वय 38 वर्ष) व्यवसाय शेती रा.जवळार्जुन चोरवाडी ता.पुरंदर, जि.पुणे यांनी आरोपी अज्ञात पिकअप वरील अज्ञात चालक यांच्या विरोधात जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत जेजुरी पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. 25/03/2025 रोजी रात्री 08/13 वाजताचे सुमारास मौजे जेजुरी गावचे हददीत गणेश मंगल कार्यालयाचे समोरून माझा चुलत भाऊ नामे विक्रम मोहन जगताप (वय 43 वर्षे) जवळार्जुन चोरवाडी ता.पुरंदर, जि.पुणे हा त्याचे ताब्यातील मोटार सायकल नं एम.एच. 14 आर 9642 हि वरून जेजुरी – मोरगाव रोडने मोरगाव बाजुकडुन – जेजुरी बाजुकडे जात असताना अज्ञात पिकअप वरील अज्ञात चालकाने त्याची पिकअप गाडी हयगयीने,अविचाराने,भरधाव वेगात चालवुन त्याचे समोरील दुसरे वाहनाला ओव्हरटेक करीत असताना समोरून मोटार सायकल वरून येणारा माझा चुलत भाऊ नामे विक्रम मोहन जगताप (वय 43 वर्षे) जवळार्जुन चोरवाडी ता.पुरंदर जि.पुणे याचे मोटार सायकलला जोरात ठोस बसुन अपघात होवुन सदर अपघातात चुलत भाउ विक्रम मोहन जगताप (वय 43 वर्ष) याचे डोके फुटुन गंभीर दुखापत होवुन तसेच शरीरावर ठिकठिकाणी किरकोळ जखमा होवुन, मोटार सायकलचे नुकसान होवुन, त्याचे जागीच मृत्यु होणेस कारणीभुत झाला आहे. म्हणुन माझी अज्ञात पिकअप वरील अज्ञात चालकाविरूदध कायदेशीर फिर्याद आहे.यावरून जेजुरी पोलीस स्टेशन गु.र.नं .106/2025 भारतीय न्याय संहिता कायदा कलम 106(1), 281, 125(ए)125(बी), 324(2) मो.वा.का.कलम 134, 184/177 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरचा अधिक तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली मपोसई पवार हे करत आहेत.



