Crime News: जेजुरी येथे आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): दिनांक 26/03/2025 रोजी सकाळी 09:00 वाजण्याचे सुमारास स्टेशन नगर जेजुरी रेल्वे ट्रॅक चे शेजारी एक अनोळखी पुरुष वय अंदाजे 40 ते 45 वर्ष याचा मृतदेह मिळून आला आहे.

सदर मयताचे पोस्टमार्टम जेजुरी ग्रामीण रुग्णालय येथे करण्यात आले असून त्याचा मृतदेह सध्या जेजुरी ग्रामीण रुग्णालय येथे शीतगृहात ठेवण्यात आला आहे. सदर मयताचे काळी पांढरी दाढी, अंगात पांढरा शर्ट, पायजमा असून गळ्यात काळा करगोटा सदर बाबत जेजुरी पोलीस येथे मनोज पंढरीनाथ जाधव (वय 33 वर्ष), व्यवसाय नोकरी राहणार रेल्वे गेट जेजुरी ता. पुरंदर, जि. पुणे, यांनी जेजुरी पोलीस स्टेशन येथे खबर दिली असून त्यावरून जेजुरी पोलीस स्टेशन अकस्मात मयत रजिस्टर नंबर 32/25 बी.एन.एस.एस.194 प्रमाणे मयत दाखल करण्यात आले आहे.

सदर मताचा तपास स.पो.नि. दीपक वाकचौरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मुजावर ब.न. 3310 मो नंबर 9822944011 हे करीत आहेत. तरी सदर मायता बाबत काही माहिती मिळाल्यास जेजुरी पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा.