News: जेजुरी पोलीस स्टेशन कडून पत्रकार दिना निमित्ताने पत्रकारांचा सन्मान

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे अवचित्य साधत पत्रकार दिनानिमित्त जेजुरी पोलीस स्टेशन कडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नव्यानेच उभारण्यात आलेल्या मल्हार नाट्यगृह येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमावेळी स.पो.नी दीपक वाकचौरे यांनी पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पत्रकार हा लोकशाहीतील चौथा महत्त्वाचा स्तंभ असल्याने पत्रकारांनी आपले काम तत्त्वाने व निष्ठेने करावे. असे सर्वांनीच अपेक्षा व्यक्त केली. यावेळी पत्रकारांना झाडे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पुरंदर तालुक्यातील जेजुरी, वाल्हा, निरा, लोणंद येथील जवळपास सर्वच ज्येष्ठ व युवा पत्रकारांनी कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती.

जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप. नि. सर्जेराव पुजारी, उपनिरीक्षक महेश पाटील, उपनिरीक्षक दिपाली पवार व पोलीस कर्मचारी वर्ग यांनी या कार्यक्रमाचे यशस्वीपणे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार नितीन राऊत यांनी केले तर पत्रकार प्रकाश खाडे यांनी आभार मानले.