आपला जिल्हा

News: रुग्णवाहिकांचे सुधारित भाडेदर निश्चित : अर्चना गायकवाड

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): प्रादेशिक प्राधिकरण, पुणे, पिंपरी- चिंचवड व बारामती कार्यक्षेत्रामधील रुग्णवाहिकांचे सुधारित भाडेदर लागू करण्यात आले असून हे भाडेदर रुग्णवाहिकेत रुग्ण बसल्यापासून परतीच्या अंतरासाठी लागू राहतील. रुग्णवाहिकांकरिता निश्चित केलेल्या दरपत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी न करणाऱ्या वाहन चालक, मालक यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी कळविले आहे.

सुधारित दरपत्रकानुसार अवातानुकुलीत मारुती व्हॅन साठी २५ कि.मी. अथवा दोन तासासाठी ७०० रुपये, त्यापुढील प्रती किलोमीटर साठी १६ रुपये, प्रति प्रतिक्षा तास १२५ रुपये, प्रतिदिन किंवा ३०० कि.मी. साठी ४ हजार रुपये, इंधन, देखभाल व दुरुस्ती व चालकांशिवाय १ हजार रुपये प्रतिदिन दर राहतील.

अवातानुकुलीत मारुती ईको, टाटा मॅजिक यासाठी २५ कि.मी. अथवा दोन तासासाठी ९०० रुपये, त्यापुढील प्रती किलोमीटर साठी १७ रुपये, प्रति प्रतिक्षा तास १२५ रुपये, प्रतिदिन किंवा ३०० कि.मी. साठी ४ हजार ५०० रुपये, इंधन, देखभाल व दुरुस्ती व चालकांशिवाय १ हजार २०० रुपये प्रतिदिन दर राहतील.

अवातानुकुलीत महिंद्रा बोलेरो, फोर्स क्रुझरसाठी २५ कि.मी. अथवा दोन तासासाठी १ हजार २०० रुपये, त्यापुढील प्रती किलोमीटर साठी १८ रुपये, प्रति प्रतिक्षा तास १५० रुपये, प्रतिदिन किंवा ३०० कि.मी. साठी ५ हजार रुपये, इंधन, देखभाल व दुरुस्ती व चालकांशिवाय १ हजार ५०० रुपये प्रतिदिन दर राहतील.

अवातानुकुलीत फोर्स टेम्पो ट्रॅव्हलरसाठी २५ कि.मी. अथवा दोन तासासाठी १ हजार ५०० रुपये, त्यापुढील प्रती किलोमीटर साठी २५ रुपये, प्रति प्रतिक्षा तास १७५ रुपये, प्रतिदिन किंवा ३०० कि.मी. साठी ७ हजार रुपये, इंधन, देखभाल व दुरुस्ती व चालकांशिवाय २ हजार रुपये प्रतिदिन दर राहतील.

वातानुकुलीत फोर्स टेम्पो ट्रॅव्हलरसाठी (आयसीयु) २५ कि.मी. अथवा दोन तासासाठी २ हजार ५०० रुपये, त्यापुढील प्रती किलोमीटर साठी ३० रुपये, प्रति प्रतिक्षा तास २५० रुपये, प्रतिदिन किंवा ३०० कि.मी. साठी १० हजार रुपये, इंधन, देखभाल व दुरुस्ती व चालकांशिवाय ४ हजार रुपये प्रतिदिन दर राहतील.

निश्चित केलेल्या भाडेदरापेक्षा जास्त भाडेदर आकारणी करणाऱ्या वाहनमालक, चालकांवर दंडात्मक कारवाई म्हणून पहिल्या गुन्ह्याकरिता ५ हजार रुपये दुसऱ्या गुन्ह्याकरिता १० हजार रुपये व तिसऱ्या व त्यापुढील प्रत्येक गुन्ह्याकरिता २० हजार रुपये याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही श्रीमती गायकवाड यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button