Uncategorized

News: जेजुरी पोलीस स्टेशनकडून बेवारस वाहनांचा लिलाव

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी पोलीस ठाण्याच्या वतीने पोलिस ठाण्याच्या आवारातील बेवारस १७३ दुचाकी वाहनांचा लिलाव करण्यात आला. या लिलावात ६ लाख १५ हजार रुपयांचा महसूल जमा झाला. जेजुरी पोलिस ठाणे हद्दीत झालेले अपघात तसेच विविध गुन्ह्यामध्ये जप्त केलेली वाहने गेली पंधरा वर्षे पोलिस ठाण्याच्या आवारात पडून होती. त्यामुळे अन्य वाहने लावण्यास जागा नसल्याने न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून या १७३ बेवारस वाहनांचा लिलाव करण्यात आला. यापोटी ६ लाख १५ हजार रुपयांचा महसूल जमा झाला.

यावेळी जेजुरीचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे, मंडल अधिकारी संजय बडदे, प्रादेशिक परिवहन विभागाचे सहायक निरीक्षक भूषण कचरे, पोलिस उपनिरीक्षक नामदेव तारडे, पोलिस हवालदार उदय पवार, विनोद माने, ग्रामस्थ व व्यापारी या वेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button