Crime News: कोळविहिरे येथे दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; 60 वर्षीय आरोपी अटकेत

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील कोळविहीरे (ता. पुरंदर) येथे १० वर्षीय अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या आरोपावरून जेजुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणातील ६० वर्षीय संशयित आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
याबाबत जेजुरी पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, कोळविहीरे येथील ६० वर्षीय झुंबर सिताराम खोमणे याच्यावर अल्पवयीन मुलीला तिच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या शेतातील सीताफळाच्या बागेत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही आरोपीने हे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यावरून जेजुरी पोलिस ठाण्यात गु.र.नं. २२७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेतील कलम ६४(१), ६४(२) (i), ६४(२)(k), ६५(२), ३५१(२), ३५१ (३) तसेच बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यातील कलम ४ व ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मपोसई राणे करीत आहेत.


