क्राईम

News: पुणे ग्रामीण घटकाने जप्त केलेले 218 तोळे सोने व 6 किलो चांदी असा जप्त केलेला मुद्देमाल फिर्यादी यांना स्वाधीन केल्याने पोलीस दलाच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे नागरीकांना दिलासा

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): पुणे ग्रामीण घटकातील दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी इत्यादी गुन्हयांच्या तपासादरम्यान जप्त केलेला मौल्यवान सोन्याचे, चांदीचे दागीने व रोख रक्कम असा मुद्देमाल विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, रंजन कुमार शर्मा यांच्या हस्ते वार्षिक निरीक्षण दरम्यान कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून फिर्यादींना सन्मानपूर्वक परत करण्यात आला आहे.

पुणे ग्रामीण घटकातील बारामती तालुका, माळेगाव, दौंड, यवत, शिक्रापुर, जेजुरी, सासवड, राजगड, वेल्हा, खेड, मंचर, पारगाव, नारायणगाव, ओतुर, इत्यादी पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, व चोरी या शीर्षकाखालील गुन्हयांचा पुणे ग्रामीण पोलीसांकडुन अत्यंत कौशल्यपूर्ण तपास, गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सखोल तपास करून आरोपी निष्पन्न करुन अटक करण्यात आले आहे. या कारवाईत आरोपीकडून सुमारे २१८ तोळे सोने, ६ किलो चांदी आणि अंदाजे ४४,००० रुपये रोख रक्कम असा एकुण रक्कम २ कोटी ९५ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयांमध्ये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल मा.न्यायालयाच्या आदेशानुसार व सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हा मुद्देमाल संबंधितांना सुपूर्द करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.

याप्रसंगी बोलताना विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणाले की, “नागरिकांच्या कष्टाची कमाई आणि मौल्यवान ऐवज चोरीला गेल्यानंतर तो लवकरात लवकर शोधून मूळ मालकांना परत करणे, हे पोलीसांचे प्रथम कर्तव्य आहे. तपास पथकाने दाखवलेली तत्परता व कौशल्यपूर्ण कामगिरी कौतुकास्पद असून, यामुळे नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाबद्दलचा विश्वास अधिक दृढ होवुन पोलिसांची लोकाभिमुख प्रतिमा निर्माण झालेली आहे.”

सदर कार्याक्रमा वेळी फिर्यादी यांना आपला चोरीला गेलेला ऐवज परत मिळाल्याने फिर्यादींच्या चेह-यावर समाधानाचे हास्य फुलले आहे. पोलीसांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नागरिकांनी प्रशासनाचे मनःपुर्वक आभार व्यक्त केले आहे. सदरच्या कामगिरीमुळ नागरीकांच्या मनात पोलीस प्रशासनविषयी विश्वासाची भावना अधिक प्रबळ झालेली असुन, पोलीस व नागरीक यांच्यातील विश्वास, आपुलकी व आत्मीयतेचे नाते अधिक वृध्दिंगत झालेले आहे.

सदर कार्यक्रम पोलीस मुख्यालय पुणे ग्रामीण येथे पार पडला असुन याप्रसंगी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार (बारामती विभाग), अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार (पुणे विभाग), पोलीस उपअधीक्षक मुख्यालय पुणे ग्रामीण, अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण, पोलीस निरीक्षक, नारायण पवार, बारामती तालुका पो स्टे, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, दौंड पो स्टे, पोलीस निरीक्षक, संतोष तासगावकर, यवत पो स्टे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, शिक्रापूर पो स्टे, सहा. पोलीस निरीक्षक कुलदीप सपकाळ, माळेगाव पो स्टे, किशोर शेवते, सहा पोलीस निरीक्षक पविण सपांगे, सहा पोलीस निरीक्षक तपास पथकातील पोलीस अंमलदार आणि फिर्यादी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button