Crime News: बारामती शहर पोलीसांनी धकाडेबाज कारवाई करून केले पाच पिस्टल जप्त

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): बारामती शहर व परिसरात अनेक गुन्हेगार हे अवैध गावठी पिस्टल घेवून रोज रोस पणे वावरात आहेत अशी बातमी बारामती शहर पोलीस स्टेशनच्या नवनिर्वाचीत प्रभारी अधिकारी श्रीमती मनिषा ओमासे परिविक्षाधीन पोलीस उप अधीक्षक यांना मिळालेली होती. त्या वातामीचे अनुषंगाने त्यांनी पोलीस स्टेशन पातळीवर विशेष पथक तयार करून अवैध अग्नी शस्त्रे बाळगणारे गुन्हेगार यांची माहिती संकलीत करण्याचे कामकाज सुरू केले. त्या प्रमाणे वारामती शहर पोलीसांनी गोपनिय बातमीदार विविध ठिकाणी पेरून माहिती घेण्यास सुरूवात केली. त्या बाबत दिनांक २२.१०. २०२६ रोजी गोपनिय माहीती मिळाली की, इसम नामे आदित्य चंद्रकांत शेलार रा. आमराई बारामती यांचेकडे एक अवैध अग्नीशस्त्र ( पिस्टल) व जिवंत काडतुसे आहेत अशी बातमी मिळाल्याने त्याबाबत त्याची माहिती काढून त्यास टिसी कॉलेज परिसरात ताब्यात घेतले असता त्याचेकडे असलेल्या स्वीप्ट कार नंबर एम एच १२ यु के ००७२ यासह त्याचे गाडीत एक गावठी पिस्टल व तीन जिवंत काडतूसे मिळाली. त्याबाबत त्याचेवर बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र.नं ४७३ / २०२६ आर्म अॅक्ट ३ (२५) या प्रमाणे गुन्हा नोंद करून तपास सुरू केला असता सदर आरोपीने सदरची अवैध अग्नीशस्त्र ( पिस्टल ) हे मुयुर विष्णु मोरे रा. मेडद वारामती याने दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने मयुर मोरे यास सदर गुन्हयात पोलीसांनी दिनांक २०.११. २०२६ रोजी अटक केली व त्याचेकडे तपास केला असता सदरची अवैध अग्नीशस्त्र ( पिस्टल) हे त्याने मौजे शिरपुर ता. शिरपुर जि. धूळे याचेकडून आणल्याची कबूली दिली. त्याप्रमाणे बारामती शहर पोलीस पथक वरिष्ठांचे परवानगीने सदर ठिकाणी गेले व त्या आरोपीचा अतिशय शितापीने शोध घेवून शांतीराम पावरा यास दिनांक २३.११.२०२६ राजी रात्री तांव्यात घेतले असता त्याचे अंगझडतीत त्याचेकडे अजुन दोन अग्नीशस्त्र ( पिस्टल) मिळाले व त्यास अटक करून पुढील तपास कामी बारामती येथे आणले व तपास केला सदर गुन्हयाचे तपासात असे एकून ३ अवैध अग्नीशस्त्र ( पिस्टल ) मिळाले असून त्याचा तपास अजुन चालू आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस हवालदार ज्ञानदेव क्षिरसागर हे करीत आहेत.
त्यानंतर हि वारामती शहर पोलीस तेवढ्यावरच थांबले नाहीत त्यांनी पुन्हा अजुन अवैध अग्नोशस्त्र ( पिस्टल) असनारे गुन्हेगार यांची माहिती काढण्याचे काम चालूच ठेवले त्यात दिनांक २४.११.२०२६ रोजी इसम नामे धीरज रविंद पडकर रा. आमराई याचेकडे एक अवैध अग्नीशस्त्र ( पिस्टल) व जिवंत काडतुसे आहेत अशी बातमी मिळाल्याने त्यावाबत त्याची माहिती काढून त्यास शिवाजी चौक बारामती येथे ताब्यात घेतले असता त्याचेकडे एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूसे मिळाली. त्याबाबत त्याचेवर वारामती शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. ५३८ / २०२६ आर्म अॅक्ट ३ (२५) या प्रमाणे गुन्हा नोंद केला असून सदर गुन्हयाचा पण तपास चालू आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस हवालदार रामचंद शिंदे हे करीत आहेत.
त्यानंतर दिनांक २६.११.२०२६ रोजी पुन्हा मंगेश सुभाष मदने रा.भिमरलनगर कसवा बारामती याचेकडे अग्नीशस्त्र ( पिस्टल ) आहे अशी बातमी वारामती शहर पोलीसांनी मिळाल्याने बारामती शहर पोलीसांनी आज रोजी त्याची माहिती काढून त्यास निरा रोड वारामती येथे ताब्यात घेतले असता त्याचेकडे एक गावठी पिस्टल व १ काडतुस मिळाले. त्यावावत त्याचेवर बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. ५४२ / २०२६ आर्म अॅक्ट ३ (२५) या प्रमाणे गुन्हा नोंद केला असून सदर गुन्हयाचा पण तपास चालू आहे. सदर शस्त्रे हि मध्य प्रदेश मधून आणली जात आहेत असे तपासात निष्पन्न झालेले असून त्याचा तपास चालू आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस हवालदार ज्ञानदेव क्षिरसागर हे करीत आहेत.



