Crime News: गावठी पिस्टल सोबत बाळगणार आरोपी पोलीसांचे ताब्यात: सासवड पोलीस स्टेशनच्या गुन्हेशोध पथकाची कामगिरी

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): दिनांक १६/०९/२०२६ रोजी चंदन टेकडी जवळ, के के पेढा दुकाणचे पाठीमागे, ता. पुरंदर जि. पुणे येथे ईसम नामे शुभम सतिश कामथे (वय २५ वर्षे) रा. शिवरी ता. पुरंदर जि. पुणे हा संशयीत रित्या मिळुन आला. त्याचेकडी चौकशी केली असता त्याने असमाधानकारक उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यास त्याचेकडील चार चाकी गाडीसह पोलीस स्टेशन येथे आणुन चौकशी केली असता त्याचेकडे अवैध अग्रीशस्त्र असलेचे सांगीतले. तेव्हा लागलीच दोन पंचाना बोलावुन घेवुन त्यांचे समक्ष गाडीची झडती घेतली असता. गाडीचे पुडील डयाश बोर्डखालील ड्रॉव्हर मध्ये एक गावठी पिस्टल मिळुन आल्याने सासवड पोलीस स्टेशन येथे ४४८/२०२६ शस्त्र अधिनियम ३,२५ प्रमणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर आरोपीस अटक करण्यात आली आहे. सदर आरोपी कडुन खालील वर्णनाचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
१) ३५,०००/- एक स्टिलचे लोखंडी बॉडीचे गावठी पिस्टल
२) ०७,००,०००/- रू. किंमतीची काळया रंगाची मारूती कंपणीची fronx कार
एकुण ०७,३५,०००/- रू किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक पुणे ग्रामिण संदीपसीह गिल्ल, अप्पर पोलीस अधिक्षक बारामती विभाग गणेश बिरादार, अप्पर पोलीस अधिक्षक पुणे विभाग शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड राजेंद्रसिह गौर, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांचे मार्गदर्शना खाली सासवड पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक शंकर राउत, पोलीस हवालदार/ २२४२ दत्तात्रय काळे, पोना/२३२९ गोकुळ हिप्परकर, पो कॉ/४३४ तुषार लोंढे. पो. कॉ/१७१४ प्रविण शेंडे, पोकॉ / २९८५ मखरे, पोकॉ/३२२१ वसंत नरळे, पोकॉ/२९४२ संजय लगड यांचे पथकाने केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक शंकर राउत हे करीत आहेत.



