News: जेजुरी: कोळविहिरे येथे घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट; अंदाजे 5,00,000/- रु. नुकसान

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील कोळविहिरे येथील लव्हाळेवस्ती परिसरात दि. 11 सप्टेंबर 2026 रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घरातील स्वयंपाकघरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली असून याबाबत फिर्यादी सीमा रंगनाथ लव्हाळे (वय 43 वर्षे), व्यवसाय – शेती, रा.- लव्हाळवाडी, ता. पुरंदर, जि.पुणे यांनी जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

याबाबत जेजुरी पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, सीमा रंगनाथ लव्हाळे या रात्रीच्या सुमारास घरातील स्वयंपाकघरात स्वयंपाक करीत असताना गॅसच्या रेग्युलेटरला आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिस्थिती लक्षात येताच त्या घराबाहेर आल्या. त्यानंतर काही वेळातच घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटामुळे घरावरील पत्रे उडून गेले असून, आगीमध्ये माझे घराची भिंती ला मोठी भेग पडली आहे. तसेच घरामध्ये माझे 20,000 रुपये जळाले आहे तसेच सर्व भांडी, कपडे जळुन अंदाजे 5,00,000/- रुपये नुकसान झाले आहे.
सदरचा अधिक तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार पोहवा भापकर हे करत आहेत.



