आपला जिल्हा

News: जेजुरी पोलीस स्टेशनकडून आगामी गणेशोत्सव सणाच्या अनुषंगाने रूट मार्च

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज) : जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दि. 12/9/26 रोजी सायंकाळी ६. ३० वा. ते ७. ३० वा. चे दरम्यान आगामी गणेशोत्सव २०२६ च्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने व मिश्र वस्ती तसेच संवेदनशील व मिरवणूक मार्गासह, महत्त्वाच्या ठिकाणी रूट मार्च घेण्यात आला.


रूट मार्च मार्ग – जेजुरी पोलीस स्टेशन -मोरगाव चौक -शिवाजी चौक- उभी पेठ- नंदी चौक – राजवाडा चौक -जानुबाई मंदिर- जोशी अळी -फकीराची विहीर- शिवाजी चौक-मोरगाव चौक


सदर रूट मार्च साठी उपस्थित अधिकारी अंमलदार – जेजुरी पोलीस स्टेशनकडील ०५ अधिकारी व १०अंमलदार तसेच होमगार्ड पथकातील २७ जवान, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १० कडील २ अधिकारी व ९० जवान असे एकूण ७ अधिकारी व १२७ अंमलदार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button