आपला जिल्हा

News: गणेश चतुर्थीच्या शासकीय सुट्टीमुळे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक मंगळवारी

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सप्टेंबर महिन्याची समितीची बैठक दुसऱ्या सोमवारी गणेश चतुर्थी निमित्त शासकीय सुट्टी असल्याने मंगळवार दिनांक १५ सप्टेंबर २०२६ रोजी विभागीय लोकशाही दिन झाल्यानंतर सकाळी ११.३० वाजता विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीत तीन महिन्यांत समितीकडे प्राप्त झालेल्या तक्रारी व त्यावर केलेल्या उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात येतो. ही बैठक सर्वसाधारणपणे तीन महिन्यानंतर पुढील महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिन झाल्यानंतर आयोजित करण्यात येते, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक तथा सदस्य सचिव शिरीष सरदेशपांडे यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button