आपला जिल्हा

News: अनुपस्थित, स्थलांतरित, मयत व दुबार मतदारांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील अनुपस्थित, स्थलांतरित, मयत तसेच दुबार (ASDD) मतदारांची यादी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या pune.gov.in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

सर्व मतदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळाला भेट देऊन सदर ए.एस.डी.डी. यादीतील नाव तपासावे. चुकीने एखाद्या मतदाराचे नाव अनुपस्थित, स्थलांतरित, मयत तसेच दुबार मतदारांची यादीमध्ये समाविष्ट झाले असल्यास त्याच संकेतस्थळार मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे (बीएलओ) नाव व संपर्क क्रमांकाची यादी देण्यात आलेली आहे. संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क करावा. म्हणजे संबंधित मतदाराचे नाव अनुपस्थित, स्थलांतरित, मयत तसेच दुबार यादीतून वगळून मतदार यादीत समाविष्ट करण्यात येईल, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button