आपला जिल्हाकृषी

News: फार्मर आयडी नोंदणी करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज) : कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला असून अद्यापही ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडीची नोंदणी केली नाही त्यांनी २० मे २०२६ पूर्वी नोंदणी करावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

राज्यात ॲग्रीस्टॅक योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. राज्यामध्ये एकूण १.७१ कोटी खातेदार असून यापैकी १.३२ कोटी शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेले आहेत. फार्मर आयडी नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या नजिकच्या सेवा सुविधा केंद्रावर किंवा स्वतःही ॲग्रीस्टॅक पोर्टलवरून ऑनलाइन नोंदणी करावी.

फार्मर आयडी नोंदणी संदर्भात कोणतीही अडचण असल्यास पुणे विभागातील शेतकऱ्यांनी सहायक कृषी अधिकारी श्रीमती संगीता ननावरे यांच्याशी ७५८८५०९४९२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button