News: पुणे जिल्ह्यात घालण्यात आलेल्या ड्रोन व मानव रहित हवाई यंत्र हवाई उड्डाणे बंदीबाबत

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): दिनांक १०.५.२०२५ रोजी झालेल्या युद्धबंदीनंतर दहशतवादी अड्डे भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केले आहेत. सदर अनुषंगाने भारतावर प्रतिहल्ला करण्यासाठी पाकिस्तानने ड्रोनचा अधिक वापर केल्याचे दिसून आले आहेञ दहशतवादी कारवांयामध्ये ड्रोन कॅमेराव्दारे टेहाळणी होवुन त्याचा अतिरेकी कारावयामध्ये उपयोग केला जाण्याची शक्यता आहे.

पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण पोलीस, यांनी पुणे ग्रामीण अधिकार क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पोलिस कायदा, १९५१ च्या कलम १० च्या उपकलम २ सह वाचलेल्या कलम ३३ च्या उपकलम (१) च्या कलम (यू) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, पुणे ग्रामीण पोलीस अधिकारक्षेत्रात ड्रोन, रिमोट-नियंत्रित मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरा मोटर्स, हैंग ग्लायडर, हॉट एअर फुगे आणि तत्सम सर्व हवेत उडाण करणारे यांचे वापरावर बंदी घालण्याबाबत प्रतिबंधात्मक दिनांक १६.०५.२०२५ पासुन दि.०३.०६.२०२५ रोजी पर्यंत जारी करीत आहोत.

सदर कालावधीत जारी केलेल्या ड्रोन व तत्सम हवाई यंञ उड्डाणावर बंदी आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. जर कोणताही व्यक्ती या आदेशाचे उल्लंघन करून ड्रोन उडवताना आढळला, तर त्यांनी तात्काळ मुख्य नियंत्रण कक्षाच्या ०२०-२५६५७१७१ किंवा जवळच्या पोलिस स्टेशनच्या हेल्पलाइन क्रमांकावर कळवावे.