Uncategorized

News: जेजुरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिल्प भूमिपूजन सोहळा संपन्न

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज) :भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्धाकृती पुतळा रस्ता रुंदीकरणावेळी, इतरत्र हलवला होता. त्यावेळी आंबेडकर अनुयायी व प्रशासन यांच्यात संघर्ष झाला होता. त्यामध्ये आंदोलनकर्ते व प्रशासन यांच्यात जी चर्चा झाली त्यातून पुर्णकृती पुतळ्यासाठी जागा देण्याचे आश्वासन तत्कालीन उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांनी दिले होते.

त्यानुसार जेजुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगवले यांनी सर्व कागदोपत्री बाबींची पूर्तता करून पुतळ्यासाठी पाच गुंठे जागा दिली. व प्रशासकीय मान्यता आणून पुतळा उभारणीसाठी मंजुरी आणली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनाचे औचित्य साधत आज पुरंदर तालुका उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांचे हस्ते पुतळा उभारणीसाठी जो चौथरा बांधायचा आहे त्याचे, प्रातिनिधिक स्वरूपात पाच टिकाव मारून भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, मुख्याधिकारी चारुदत्त इंगवले, जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे हे उपस्थित होते. तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून जयंती दिनाच्या सर्व भारत वासियांना वर्षा लांडगे यांनी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी त्यांनी पुतळा उभारणीसाठी व सुशोभीकरणासाठी सर्वोतपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे यांनी देखील जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे आभार पुतळा कृती समितीचे सचिव यांनी मानले त्यावेळी त्यांनी प्रशासनाने वेळोवेळी सहकार्य केल्याचा उल्लेख केला. त्यावेळी ते असे म्हंटले की डॉ. आंबेडकर यांचा पुर्णकृती पुतळा पंधरा फूट उंच व त्यामागे बावीस फूट उंच संविधान प्रास्ताविका, त्याचेवर सहा फूट उंच अशोक स्तंभ आणि खाली चौथऱ्याच्या बाजूने असा जवळपास सोळाशे चौ. फूट असा हॉल काढायचा आहे. त्यासाठी प्रशासनाने मदत करावी.

या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा कृती समिती जेजुरी व समस्त डिखले -भालेराव यांनी केले होते. मार्तंड देव संस्थान चे विश्वस्त मंगेश घोणे, संदीप जगताप खांदेकरी मानकरीचे अध्यक्ष जालिंदर खोमणे मा. नगराध्यक्ष सौ. विना सोनवणे तसेच यावेळी समिती चे अध्यक्ष गौतम भालेराव, खजिनदार भगवान डिखळे सदस्य प्रशांत नाझरेकर, प्रमोद डिखळे, स्वप्नील भालेराव, दादा भालेराव तसेच समस्त ग्रामस्थ आजी माजी नगरसेवक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button