Uncategorized

News: डी. एल. एड्. परीक्षेचा निकाल जाहीर

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत डिसेंबर २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या डी.एल.एड्. परीक्षेचा निकाल परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविली आहे.

मराठी, उर्दू, हिंदी, इंग्रजी व कन्नड माध्यमाच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या ४ हजार २८५ विद्यार्थ्यांपैकी ४ हजार २२९ विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते. सर्व माध्यमातील एकूण २ हजार ४६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना निकालाचे मूळ गुणपत्रक संबंधित अध्यापक विद्यालयामार्फत यथावकाश हस्तपोच मिळणार असून उत्तरपत्रिकेची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेची छायाप्रत मागणीसाठी २० फेब्रुवारी २०२५ पर्यंत अर्ज करता येईल, असेही श्रीमती ओक यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button