क्राईम

Crime News: चारचाकी वाहने चोरणाऱ्या सराईत आंतरजिल्हा टोळीचा म्होरक्या जेरबंद करून तीन गुन्हे उघडकीस; दोन चारचाकी वाहने असा एकूण 11 लाख 40 हजार रूपये किं.चा मुद्देमाल हस्तगत

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): शिरुर पो.स्टे १) गु.र.नं. ७१९/२०२४ भा.न्या.सं.२०२३ चे ३०३ (२) प्रमाणे दि. २६/०८/२०२४ रोजी गुन्हा दाखल असून सदर गुन्हयात मारूती सुझुकी कंपनीची पांढरे रंगाची इरटीगा कार नं. एम.एच.१२ टी.डी. ०७०२ ही चोरी गेली होती. सदर बाबत योगेश आनंदा गुंड रा. बाबुराव नगर, शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे यांनी फिर्याद नोंदविली आहे.

शिरूर परीसरात चारचाकी वाहन चोरीचे गुन्हे वाढले होते. सदर गुन्हयांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने चालू करणेत आला सदर गुन्हयाचे तपासा दरम्यान वाहन चोरी गेलेल्या ठिकाणापासून सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासणेत आले चोरी गेलेले वाहन हे अहमदनगर बाजुकडे गेल्याचे निष्पन्न झाले, अशा प्रकारचे गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार नामे नदीम दाउद शेख रा. बुलढाणा यानेच सदरचा गुन्हा केला असल्याचा संशय निर्माण झाला, त्यानंतर त्याचेबाबत खात्री करत असताना, गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, गुन्हेगार नामे नदीम दाउद शेख यानेच शिरूर परिसरात चारचाकी वाहनांची चोरी केली आहे व तो देऊळगाव राजा, बुलढाणा येथे असून त्याचे जवळ गुन्हयातील चोरी केलेली इरटीगा कार आहे. अशी खात्रीशीर बातमी पथकाला मिळाली होती. स्था.गु.शा.चे पथक व शिरूर पो.स्टे. चे पथकाने मिळून आरोपी नामे नदीम दाउद शेख (वय ३२ वर्षे) रा.मु.पो.धाड ता. जि. बुलढाणा सध्या रा. कुंबेफळ जालना रोड, छत्रपती संभाजी नगर यास देऊळगाव राजा येथून कायदेशीर रित्या ताब्यात घेण्यात आले.

आरोपी नदीम शेख यास विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्याने १) गु.र.नं. ७१९/२०२४ भा.न्या.सं. २०२३ चे ३०३ (२), २) शिरुर पो.स्टे गु.र.नं. ६६३/२०२४ भा.न्या.सं. २०२३ चे क. ३०३ (२), ३) संगमनेर पो.स्टे गु.र.नं. ७५०/२०२४ भा.न्या.सं.२०२३ चे क. ३०३ (२) असे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून त्याचेकडून इरटीगा कार नं. १२ टी.डी. ०७०२ व स्विफ्ट डिझायर नं. एम.एच. १७ ए. जे. ७०८३ अशा दोन चारचाकी कार एकूण ११ लाख ४० हजार रूपये किंमतीच्या हस्तगत करणेत आलेल्या असून सदरचे गुन्हे त्याने त्याचे साथीदार नामे विशाल जाधव व किशोर पवार पुर्ण नाव पत्ता माहिती नाही यांचे मदतीने केले असल्याचे सांगितले आहे.

आरोपी नदीम शेख यास कार चोरी बाबत विचारपूस करता, तो कार चोरी करणेपुर्वी पंजाब राज्यातील जुना बाजार मार्केट मधून OBDstar नावाचे इलेक्ट्रानिक मशीन व कारच्या डुप्लीकेट चावी प्राप्त करून घेत असे. चावीचे मॉडेल हे ज्या वर्षातील आहे, त्याप्रमाणे कारचे मॉडेल चेक केले जाते. त्यासाठी काचेवर नमुद असलेले मॉडेलचे वर्ष पाहून कारचे ड्रायव्हर बाजूचे काचेतून तार किंवा पट्टी टाकून दरवाजा उघडला जातो, त्यानंतर OBDstar नावाचे इलेक्ट्रॉनिक मशीन कारला कनेक्ट करून सिस्टीम चालू करून डुप्लीकेट चावी ही अॅक्टीव्ह केली जाते व कार चालू करून चोरी करतात. कार पुढे तामिळनाडू, कर्नाटक राज्यात पाठविली जाते किंवा कारचे स्पेअर पार्ट करून विक्री केली जाते असे सांगितले.

आरोपीने पंजाब येथून उपलब्ध केलेले OBDstar नावाचे इलेक्ट्रानिक मशीन, डुप्लीकेट चाव्या, ड्रिल मशीन, स्कु ड्रायव्हर असे साहित्य जप्त केले आहे. आरोपी नदीम शेख याचेवर अहमदनगर, पुणे ग्रामीण, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा या जिल्हयात चारचाकी वाहन चोरीचे ११ गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपीकडून मागील वर्षात स्थानिक गुन्हे शाखेने ४ चारचाकी वाहने तामिळनाडू राज्यातून हस्तगत केल्या होत्या.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पुणे विभाग, एस.डी.पी.ओ. प्रशांत ढोले, शिरूर विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर पो स्टे चे पोसई एकनाथ पाटील, स्था.गु.शा.चे अंमलदार तुषार पंदारे, जनार्धन शेळके, संजु जाधव, राजु मोमीण, अतुल डेरे, मंगेश थिगळे, सागर धुमाळ शिरुर पो स्टे अंमलदार नाथासाहेब जगताप, विजय शिंदे, नितेश थोरात, योगेश गुंड यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button