आपला जिल्हा

News: पक्क्या अनुज्ञप्तीसाठी शिबीर दौऱ्याचे आयोजन

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ऑक्टोबर महिन्यात पक्क्या अनुज्ञप्तीसाठी शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत खेड येथे ३ व ४ ऑक्टोबर, मंचर येथे ७ व ८ ऑक्टोबर, जुन्नर येथे १४ व १५ ऑक्टोबर, वडगाव मावळ येथे २१ व २२ ऑक्टोबर तर लोणावळा येथे २८ व २९ ऑक्टोबर या दिवशी पक्क्या अनुज्ञप्ती शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्क्या अनुज्ञप्तीचा कोटा ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता उपलब्ध होणार असल्याचेही प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button