क्राईम

Crime News: तीन दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून चार इसमांना ताब्यात घेवून तीन गावठी पिस्टल व चार जिवंत काडतूस असा एकूण 1 लाख 7 हजार 500 रू. चा मुद्देमाल हस्तगत

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): अवैध रित्या गावठी पिस्टल, कट्टा बाळगून त्याचा वापर करून गुन्हे करण्याचे प्रमाण वाढले असल्याने अशा इसमांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी अवैध गावठी पिस्टल बाळगणारे इसमांवर कायदेशीर कारवाई करणेबाबत तपास पथकांना आदेशीत केले असता, दि. २०/०९/२०२४ रोजी राजगड पोलीस स्टेशन हद्दीतील दिडघर फाटा येथे इसम नामे संकेत गोरख चोरघे, (वय २१ वर्षे) सध्या रा. आंबेगाव पठार सर्व्हे नं. १६ गणेश मंदीर जवळ ता. हवेली जि.पुणे मुळ रा. कोळवाडी ता. वेल्हा जि.पुणे यास ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता, त्याचे कंबरेला एक गावठी पिस्टल व तीन जिवंत काडतुस असा एकूण ३६,५००/- रू किं.चा मुद्देमाल हस्तगत करणेत आला आहे. त्याबाबत राजगड पोलीस स्टेशन गु.र.नं. ४४२/२०२४ भा.ह.का.क. ३,२५ प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे. दि. २१/०९/२०२४ रोजी खेड पोलीस स्टेशनचे हद्दीत मौजे होलेवाडी बायपास येथे इसम नामे १) प्रथमेश रमेश बोऱ्हाडे (वय २५ वर्षे), रा. चव्हाण मळा, पाबळ रोड, राजगुरूनगर, ता. खेड जि पुणे २) सुनील बबन पाचपुते (वय २६ वर्षे) रा. चिंचोशी, ता. खेड जि पुणे यांना ताब्यात घेवून त्यांचे ताब्यात एक गावठी पिस्टल असा ३५,०००/- रू किं.चा मुद्देमाल हस्तगत करणेत आला आहे. त्याबाबत खेड पोलीस स्टेशन गु.र.नं. ५३५/२०२४ भा.ह.का.क. ३,२५ प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे.

दि. २२/०९/२०२४ रोजी जुन्नर पोलीस स्टेशनचे हद्दीत मौजे कुरण गावचे हद्दीतील बसस्टॉप जवळ इसम नामे रोहित सहादू बटणपुरे वय २४ वर्षे, रा. बहुळ, ता. खेड, जि. पुणे यांना ताब्यात घेवून त्यांचे ताब्यात एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूस असा ३६,०००/- रू किं.चा मुद्देमाल हस्तगत करणेत आला आहे. त्याबाबत जुन्नर पोलीस स्टेशन गु.र.नं. ३११/२०२४ भा.ह.का.क. ३,२५ प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे.

आगामी नवरात्रौत्सव व विधानसभा निवडणुकचे पार्श्वभुमीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने अवैध गावठी पिस्टल बाळगणारे इसमांवर केलेल्या कारवाईमुळे अवैध गावठी पिस्टल बाळगणारे, विक्री करणारे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. आरोपीनी पिस्टल कोठून आणले आहेत, त्याचे मुळ स्त्रोतापर्यंत जावून तपास करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख पुणे ग्रामीण यांनी सांगितले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे ग्रामीण, अ.पो. अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग, अ.पो. अधीक्षक गणेश बिरादार बारामती विभाग, तानाजी बरडे एस.डी.पी.ओ. भोर उपविभाग, अमोल मांडवे, एस.डी.पी.ओ. खेड उपविभाग, रविंद्र चौधर, एस.डी.पी.ओ. जुन्नर उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोसई अभिजीत सावंत, पोलीस अंमलदार हनुमंत पासलकर, दिपक साबळे, विक्रम तापकीर, संदिप वारे, मंगेश थिगळे, रामदास बाबर, अमोल शेडगे, तुषार भोईटे, मंगेश भगत, बाळासाहेब खडके, सागर नामदास, राजू मोमीण, अतुल डेरे, हेमंत विरोळे, अक्षय नवले, निलेश सुपेकर यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button