Crime news: सदर महिलेस कोणी ओळखत असेल तर जेजुरी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज) : दिनांक 22/08/2025 रोजी रात्री 08:00 वाजण्याचे सुमारास जेजुरी जानुबाई मंदिर समोरून एक अनोळखी महिला वय अंदाजे 46 वर्ष हिचे पायाला जखमा झाल्याने व फोड आलेने तिला प्रथम ग्रामीण रुग्णालय जेजुरी उपचार कमी नेले होते. पुढील उपचार कमी तिला दि. 23 08/25 रोजी ससून हॉस्पिटल येथे रेफर करण्यात आले होते. तिचा उपचार दरम्यान दि 23/08/25 रोजी सायंकाळी 07:15 मयत झाली आहे. मयताचे पोस्टमार्टम ससून हॉस्पिटलम पुणे येथे करण्यात आले आहे.
सदर सदर महिलेचे डोके काळे लांब केस डोळ्या अर्धवट उघडे तोंड अर्धवट उघडे अंगात हिरव्या रंगाची साडी व लाल रंगाचा ब्लाऊज सादर महिलेचे उजवे पायाला फोड येऊन जखमा झाल्याचे दिसत आहेत. सदर बाबत दि 04/092025 रोजी जेजुरी पोलीस स्टेशन अकस्मात मयत रजिस्टर नंबर 91/25 बी.एन.एस.एस.194 प्रमाणे मयत दाखल करण्यात आले आहे.
सदर मयताचा तपास स.पो.नि. दीपक वाकचौरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नांदे ब.न. 2359 हे करीत आहेत. तरी सदर मयता बाबत काही माहिती मिळाल्यास जेजुरी पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा.



