क्राईम

Crime News: कंबरेला गावठी पिस्टल लावून फिरणारा रेकॉर्ड वरील गुन्हेगार जेरबंद करून एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतूस हस्तगत

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): दि.०८/०१/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे उघडकीस आणण्याचे अनुषंगाने गस्त करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्ड वरील आरोपी नामे निखिल सतीश थेऊरकर रा. कडे ता. शिरुर, जि.पुणे हा शिरुर बायपास रोडवर सुनिल वडेवाले टपरी जवळ उभा असून त्यांचे कंबरेला गावठी पिस्टल लावले आहे.

अशी बातमी मिळालेने स्था.गु.शा.चे पथकाने दोन पंचांसह शिरुर बायपास रोडवर सुनिल वडेवाले टपरी येथे छापा कारवाई करून इसम नामे निखिल सतीश थेऊरकर (वय २१वर्षे) रा.कर्ड ता.शिरुर जि.पुणे याची अंगझडती घेतली असता, त्याचे कंबरेला एक गावठी पिस्टल व मॅग्झीनमध्ये दोन जिवंत काडतुस असा एकूण ४१,०००/- रू कि.चा मुद्देमाल हस्तगत करणेत आला आहे. आरोपी निखिल सतीश थेऊरकर हा परभणी ग्रामीण पो.स्टे कडील गु.र.नं. ३६६/२०२४ बी.एन.एस. १०९, ३५२, ३५१, (२), (३), ३(५) सह भा.ह.का. कलम ३, २५ प्रमाणे दाखल गुन्हयात फरार आहे. सदर आरोपीवर शिरुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नोंद १७/२०२५ भा.ह.का. ३,२५ प्रमाणे गुन्हा नोंदविणेत आलेला आहे. त्याने सदरचे अवैध गावठी पिस्तुल बाळगण्यामागे त्याचा नेमका कोणता हेतू आहे याकरीता त्यास मा न्यायालयात हजर करेणत आलेले असून स्था.गु.शा. व शिरुर पोलीस स्टेशन पुढील तपास करत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे ग्रामीण,अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग, प्रशांत ढोले उपविभागीय पोलीस अधिकारी शिरुर उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरुर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजय जाधव, राजू मोमीन, मंगेश थिगळे यांनी केली असून पुढील तपास शिरुर पोलीस स्टेशन करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button