क्राईम

Crime News: व्यवसाय करण्यासाठी बकऱ्या विकत घेवून देण्याचा बहाणा करून दरोडा टाकणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): हैद्राबाद येथील इसमास व्यवसाय करण्यासाठी स्वस्त दरात बकऱ्या घेवून देतो असे सांगून ऊरुळी कांचन येथे बोलावून घेवून त्या इसमास व त्याचे साथीदारांना बकऱ्या दाखविणेसाठी शेताकडे नेले आणि त्या ठिकाणी त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांचे जवळी रोख रक्कम पाच लाख रुपये, मोबाईल, गळयातील चेन असा ५,८३,०००/- किंमतीचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला होता. याबाबत अब्दुला लालबादशाह शेख (वय ३० वर्षे) रा. हैद्राबाद, जेडीमेटला एरीया, जि. रंगारेड्डी राज्य आंध्रप्रदेश यांनी ऊरूळी कांचन पोलीस स्टेशन गु.र.नं. ७२/२०२४ भा.दं.वि.का.क. ३७९,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आलेला आहे.

सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथकामार्फत चालू असताना सीसीटीव्ही तपासण्यात आले. गुन्हयाची कार्यपद्धतीचा अभ्यास केला. गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे अमोल काढण भोसले रा. कोळगाव ता श्रीगोंदा जि अहमदनगर याने त्याचे साथीदारांचे मदतीने केला असल्याचे समजले. तसेच सदरचा गुन्हेगार हा त्याचे साथीदारांसोबत सध्या खोपोली परीसरात राहत असल्याची बातमी मिळाल्याने त्यांचे बाबत पथकाने माहिती प्राप्त करून घेतली.

दि ०६/०२/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखा व ऊरुळी कांचन पो स्टे कडील पथक गुन्हयाचा तपास करत असताना संशयित गुन्हेगार अमोल भोसले हा त्याचे साथीदारांसोबत लोणावळा परीसरात आला असल्याची बातमी स्था.गु. शाखेच्या पथकाला मिळाली. बातमीप्रमाणे सापळा लावून १) अमोल काढण भोसले (वय ३२ वर्षे) रा. कोळगाव पांढरेवाडी ता.श्रीगोंदा जि. अहमदनगर २) शिवा पैदास ऊर्फ सुरेश चव्हाण (वय १९ वर्षे) रा. वेठेकरवाडी ता.श्रीगोंदा, जि. अहदनगर ३) श्याम पैदास ऊर्फ सुरेश चव्हाण (वय २३ वर्षे) रा. वेठेकरवाडी ता.श्रीगोंदा, जि. अहदनगर यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचे सांगितले आहे.

यातील आरोपी अमोल काढण भोसले यांचे विरुध्द पुणे ग्रामीण, अहमदनगर जिल्हयात दरोडा, जबरी चोरी, घरफोडी चोरीचे एकुण ९ गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, बारामती विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव, दौंड विभाग, दौंड यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, ऊरळी कांचन पोलीस स्टेशनचे पोनि शंकर पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि राहुल गावडे, पोसई अमित सिदपाटील, पोसई पाडुळे पोलीस अंमलदार सचिन घाडगे, दिपक साबळे, अजित भुजबळ, विक्रम तापकीर, योगेश नागरगोजे, राजु मोमीन, अतुल डेरे, बाळासाहेब खडके, मंगेश भगत, अक्षय नवले, निलेश सुपेकर, दगडू वीरकर यांनी केली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास ऊरळी कांचन पोलीस स्टेशन हे करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button