क्राईम

Crime News: प्रवाश्यांचे बॅगेतील सोन्याचे दागिने व रक्कम चोरी करणारी सराईत महिला आरोपी जेरबंद करून 235 ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 11,64,000/- किं.चा मुद्देमाल हस्तगत

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): दि. ०२/०३/२०२४ रोजी फिर्यादी नामे अलका वसंतराव बनकर, (वय ५९ वर्षे), रा. ताम्हाणेनगर, अकलूज ता. माळशिरस, जि. सोलापूर या पुणे येथे जाणेकरीता इंदापूर एस.टी. स्टैंड येथून एस.टी. बस मध्ये बसून पुण्याकडे निघाल्या होत्या. एस.टी. बस मध्ये चढताना त्यांचे बॅगेतील लहान पर्स कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून चोरून नेली होती. त्यामध्ये साडे पंधरा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ८,०४,०००/- रु. किं.चा मुद्देमाल चोरी गेला आहे. त्याबाबत इंदापूर पोलीस स्टेशन गु.र.नं. २१८/२०२४ भा.दं.वि.का.क. ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आलेला आहे.

सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथकामार्फत चालू असताना सीसीटीव्ही तपासण्यात आले. गुन्हयाची कार्यपद्धतीचा अभ्यास केला. गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील महिला आरोपी नामे अश्विनी अवि भोसले, रा. माही जळगाव ता. कर्जत जि. अहमदनगर हिने सदरचा गुन्हा केलेबाबत बातमी मिळाली होती. सदर महिला आरोपीची माहिती मिळवून तपास चालू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला बातमी मिळाली की, सदरची महिला आरोपी ही कर्जत परीसरात आली असल्याची माहिती मिळाल्याने दि. ०७/०३/२०२४ रोजी स्था.गु.शा. चे पथक व इंदापूर पोलीस स्टेशन कडील तपास पथकासह जावून सापळा रचून आरोपी महिला नामे अश्विनी अवि भोसले, (वय २३ वर्षे), रा. माही जळगाव ता. कर्जत जि. अहमदनगर हिस ताब्यात घेण्यात आले. तिचेकडे करणेत आलेल्या चौकशीत तिने नमुद गुन्हा केल्याचे सांगितले असून तिला विश्वासात घेवून तिचे कडे चौकशी करता, तिने १) खेड पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. १४१/२०२४ भा.दं.वि.का.क. ३७९ व २) इंदापूर पो स्टे गु.र.नं. ६१०/२०२३ भा.दं.वि.का.क. ३७९ यांचेसह एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

महिला आरोपी नामे अश्विनी अवि भोसले हिचेकडून नमुद गुन्हयांतील चोरी गेलेल्या सोन्याचे दागिन्यांपैकी २३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ११,६४,०००/- किं.चा मुद्देमाल हस्तगत करणेत आलेला आहे.

महिला आरोपी अश्विनी अवि भोसले, (वय २३ वर्षे), रा. माही जळगाव ता. कर्जत जि. अहमदनगर हिच विरोधात यापुर्वी जामखेड, करमाळा, हडपसर, पिंपरी पोलीस स्टेशनला अशा प्रकारचे एकूण ५ गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, बारामती विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, बारामती विभाग, बारामती यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, इंदापूर पो स्टेचे पो नि सुर्यकांत कोकणे, स्था.गु.शा. चे सपोनि योगेश लंगुटे, कुलदीप संकपाळ, इंदापूर पो स्टे चे पोसई विवेकानंद राळेभात, स्थागुशाचे पोलीस अंमलदार बाळासाहेब कारंडे, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहीवळे, राजू मोमीण, अतुल डेरे, निलेश शिंदे इंदापूर पोस्टे चे पोलीस अंमलदार प्रकाश माने, सलमान खान, नंदू जाधव, विशाल चौधर, गणेश डेरे, निलेश केमदारने, महिला पोलीस अंमलदार रेश्मा जगताप, वंदना भोंग यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button