क्राईम

Crime News: जेजुरी सासवड महामार्गावर असलेल्या काका हलवाई दुकानाचे शटर उचकटून चोरी; 1,59,000/- रोख रक्कम लंपास

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज) : जेजुरी सासवड महामार्गावर असलेले काका हलवाई दुकानाचे शटर उचकटून चोरी झाल्याची घटना घडली असून याबाबत फिर्यादी अक्षय दत्तात्रय भोईटे (वय 30 वर्षे) व्यवसाय मिठाई शॉप (काका हलवाई स्वीट सेंटर) नाझरे कॉलनी, नाझरे क प ता. पुरंदर जि पुणे यांनी आरोपी अज्ञात तीन इसम यांच्या विरोधात जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत जेजुरी पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि.4/09/2026 रोजी पहाटे 3/17 वा. लवथळेश्वर जेजुरी ता. पुरंदर, जि. पुणे येथे जेजुरी सासवड रोड लगत असलेले काका हालवाई दुकान अनोळखी तीन इसम त्याचे तोडाला रुमाल बांधून दुकानाचे शटर कशाचे तरी साह्याने उचकटुन आत प्रवेश करुन दुकानातील 9608-/ रु किमतीची एकुण 6 किलो वजनाची मिठाई कि. अं तसेच 1,50,000/- रु रोख रक्कम असे एकूण 1,59,600/- रु चोरी करून नेली आहे म्हणून माझी त्या दुचाकी वरील अनोळखी तीन इसमाचे विरुध्द तक्रार आहे. याप्रकरणी जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये गु.२.नं. 269/2826 बीएनएस 331 (4), 305(अ),3(5) याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सदरचा अधिक तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई थोरात हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button