आपला जिल्हाक्राईम

Crime News: सुपा: शेरेची वाडी येथील चोरीसाठी दोन वृध्द महिलांची निघृण हत्या करणाऱ्या आरोपीस केले अटक : पुणे ग्रामीण पोलीस दलाची कारवाई

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): २९/०९/२०२६ सुपा पोलीस स्टेशन गु.र.नं.२१२/२०२६ भा.न्या.सं कलम १०३ (१), ३०९ (४), ३३२(क) प्रमाणे दि. ०२६ रोजी गुन्हा दाखल असून सदर गुन्हयातील फिर्यादी नामे गणेश मारूती लडकत (वय ४५ वर्षे), व्यवसाय. नोकरी, मुळ रा. शेरेची वाडी ता. बारामती जि.पुणे सध्या रा. रम्यनगरी अपार्टमेंट, सातव चौक, तांदुळवाडी रोड, बारामती जि.पुणे यांनी फिर्याद दिली की, कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीचे राहते घरात जबरदस्तीने घुसुन घरातील कपाटातील सामानाची उचकापाचक करुन, त्यानंतर घराचे समोर ओटयावर फियादीची आई इंदुमती मारूती लडकत (वय ७५ वर्ष) व चुलत वहिणी कृष्णाबाई कुंडलीक लडकत (वय ५५ वर्षे) दोन्ही रा. शेरेचीवाडी ता. बारामती जि.पुणे या दोघी झोपलेल्या असताना त्यांचे अंगावरील एकुण ६,००,०००/- रु. किंमतीचे ५ तोळे सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेवुन त्यांना कोणत्यातरी धारदार हत्याराने त्यांचे मानेवर, गळ्यावर गंभीर वार करून त्यांचा खून केला आहे वगैरे बाबत वरील प्रमाणे गुन्हा नोंदविणेत आला आहे.

सदरचा गुन्हा हा अत्यंत गंभीर स्वरुपाचा असल्याने गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून सदर गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने विशेष पोलीस महानिरीक्षक, रंजनकुमार शर्मा कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर, पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल्ल पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखा, सुपा पोलीस स्टेशन, दौंड पो स्टे, बारामती शहर पो स्टे, बारामती तालुका पो स्टे यांना सदरचा गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणणे बाबत सुचना दिल्या. त्यानुसार अधिकारी व अंमलदार यांची ०८ पथके तयार करून घटनास्थळाच्या आसपासच्या संपूर्ण भागातील, तसेच पंचकृषीतील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. व अशाच प्रकारचे गुन्हे करणारे आरोपी चेक करण्यासाठी पथकांमार्फत अहिल्यानगर, सोलापूर, सातारा, बीड, कोल्हापूर, निपानी कार्नाटक या ठिकाणी जावून २०० हून अधिक रेकॉर्ड वरील आरोपी चेक केले. सदर गुन्हयामध्ये स्थानिक भागातील आरोपी आहेत काय याचा तपास कण्यायासाठी पथकास सुचना दिल्या त्याप्रमाणे स्थानिक भागातील रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच शेरेवाडी गावातील स्थानिक नागरीकांवर, फिर्यादी यांचे घराच्या शेजारी राहणारे लोकांवर लक्ष ठेवण्यात आले. पथके तपास करत असताना शेरेवाडी गावातील एका इसमाची संशयास्पद हालचाल पथकास आढळून आल्याने पथकाने इसम नामे विकास उर्फ अप्पा राजेंद्र लडकत (वय २५ वर्षे) रा. शेरेवाडी ता. बारामती जि. पुणे यास ताब्यत घेवुन त्याचेकडे विचारपूस करत असताना तो गोधळलेल्या अवस्थेत असल्याचे पथकास प्रथम दर्शनी आढळून आले. त्यामुळे त्याचेकडे अधिकची विचारपूस करुन त्याला विश्वासात घेतले असता त्याने मीच सोन्याचे दागिने चोरी करून आमच्या भावकीतील दोन्ही महिलांचा कुन्हाडीने वार करुन खून केल्याचे कबूल केले. तसेच त्यांच्या अंगावरील चोरी केलेले सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे. सुपा पोलीस स्टेशन पुढील तपास करत आहेत.

सदरची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक, रंजनकुमार शर्मा कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर, पुणे ग्रामीण पोलीस आधीक्षक संदीप सिंग गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार बारामती विभाग, अपर पो. अधिक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, बारामती उपविभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, बारामती शहर पो स्टे चे पोलीस निरीक्षक शैलेश चिवडशेट्टी, सुपा पो स्टे चे सहा. पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके, स्था.गु.शा.चे सपोनि महादेव शेलार, पोसई सुधिर वाळुंज, पोसई युवराज धोंडे, पोसई ज्ञानेश्वर राऊत, पोसई बाळासाहेब कारंडे, सुपा पो स्टे चे पोसई शिवाजी मुंढे, पोसई उदय पवार, दौड पो स्टे चे पोसई कदम स्था.गु.शा.चे पोलीस अंमलदार शिवाजी निकम, सचिन घाडगे, असिप शेख, दिपक साबळे, संतोष तोडकर, राजु मोमीन, किशोर तेलंग, शैलेश स्वामी, गुलाब पाटील, पोपट नाळे, अजय घुले, योगेश नागरगोजे, स्वप्निल अहिवळे, निलेश शिंदे, गुरुनाथ गायकवाड, सुभाष राऊत, विकास कापरे, अक्षय यादव, विशाल भोराडे, महेश खारात, संतोष भापकर, अमोल शेडगे, सुलतान डांगे, रहिस मुलाणी, गणेश डेरे, तुषार चव्हाण, संदिप वारे, अक्षय नवले, अभिमन्यु मोटे, अतुल डेरे, चेतन पाटील, भारत मोहोळ व सुपा पो स्टे चे पोलीस अंमलदार महेंद्र गायकवाड, रुपेश साळुंखे, राहुल भाग्यवंत, संदीप लोंढे, विशाल गजरे, संतोष जावीर, तुषार जैनक, किसन ताडगे, महादेव साळुंखे, सचिन दरेकर, निहाल वनवे, भाउसाहेब चौधरी, आदेश मावळ, योगेश सरोदे, पियुष माळी, रुषिकेश वीर, अश्विनी चांदगुडे, प्रणाली भोसले, बारामती शहर पो स्टे पोलीस अंमलदार, पोहवा/क्षीरसागर, पोहवा/झणझणे, पोहवा/काझी, बारामती तालुका पो स्टे चे पोलीस अंमलदार सुरेंद्र वाघ, मनोज पवार, अवधूत शिंदे, दौंड पो स्टे चे पोलीस अंमलदार पोहवा/बोराडे, पोहवा/गाढवे यांनी केली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके, सुपा पोलीस स्टेशन हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button