Crime News: उरूळी कांचन पोलीस ठाणे व सी.आय.डी. पुणे यांचे कारवाईत हडपसर दारूकांडातील आरोपी ताब्यात

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): १) हडपसर ठाणे गुन्हा नोंद क. ३७९/२०२६ २) दापोडी पोलीस ठाणे गुन्हा नोंद क. ११४/२६ कलम १०५, १२३, १२५ भारतीय न्याय संहिता मधील पाहिजे आरोपी नामे दत्ता उर्फ भावडया भिमराव लोंढे रा. पांढरस्थळ, उरुळी कांचन याला उरूळी कांचन पोलीस ठाणेचे पथकाने ताब्यात घेतले आहे.
सदर गुन्हयात पुणे शहर हददीत विषारी दारू सेवनाने इतके २२ बळी गेले आहेत. गुन्हयातील सराईत आरोपी दत्ता उर्फ भावडया भिमराव लोंढे हा शिंदवणे व शिंदवणे घाट परिसरात आला असले बाबत हा वेशांतर करून व रूप बदलुन फिरत असलेबाबत गोपनिय माहिती मिळाली होती. सदर माहितीच्या आधारावर पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, पुणे ग्रामीण, पोलीस अधिक्षक शफकत अमना, सी. आय. डी. पुणे घटक, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस, दौंड विभाग, दौंड पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली उरूळी कांचन पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार, सहा. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ शिंदे, सहा. फौजदार रमेश भोसले, पोलीस हवालदार सोमनाथ चितारे, पोलीस हवालदार सचिन जगताप, पोलीस हवालदार कमलेश होले, पोलीस शिपाई अक्षय कामठे, पोलीस शिपाई ऋषिकेश रासकर, पोलीस शिपाई संजय दाणे, पोलीस शिपाई सोमनाथ सुपेकर असे पथक सदर बातमी गोपनिय ठेवुन दत्ता उर्फ भावडया भिमराव लोंढे याचा शोध घेतला असता सदर आरोपी हा राजेवाडी ता. पुरंदर जि. पुणे या गावी वेशांतर करून व रूप बदलुन व त्याच्या गाडीची नंबरप्लेट बदलुन त्या ठिकाणावरून पळुन जाण्याच्या तयारीत असताना पोलीस पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेवुन त्याची ओळख पटवुन उरूळी कांचन पोलीस ठाणे येथे आणले असुन सदरची कारवाई उरूळी कांचन पोलीस ठाणे व सी.आय.डी पुणे यांनी केली असुन आरोपी याला पुढिल तपासकामी सी. आय. डी. पुणे पथकाचे प्रमुख डी. वास. एस.पी शामराव काळे व पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे.



