आपला जिल्हा

News: नियमांच्या चौकटीत राहून उत्साहाने गणेश उत्सव साजरा करा: पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): नियमांच्या चौकटीत राहून उत्साहाने गणेश उत्सव साजरा करा. डिजे,डॉल्बी ही आपली संस्कृती नाही त्याच्या नादी लागू नका. पारंपारिक वाद्य व्यवसायिकांना प्रोत्साहन द्या. असे आवाहन पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी केले.

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीचे जेजुरी येथे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीस जेजुरी, नीरा, वाल्हे व पंचक्रोशीतील गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना रवींद्र पाटील यांनी ब्रिटिश काळात फोडा आणि झोडा या नीतीच्या विरोधात जनजागृती व राष्ट्रीय ऐक्य निर्माण करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेश व शिव जयंती सुरू केली. गणेशोत्सवाला पुणे जिल्ह्यात मोठी परंपरा आहे. येणारा गणेशोत्सव कायद्याच्या, नियमांच्या चौकटीत राहून मोठ्या उत्साहाने साजरा करा. महाराष्ट्र शासनाने हा उत्सव राज्य उत्सव म्हणून जाहीर केला आहे. राज्य व जिल्हा स्तरावर गणराया पुरस्कार मिळविण्यासाठी मंडळांनी प्रयत्न करावेत.

डीजे डॉल्बीच्या नादी लागून नका, महिला वयोवृध्द, लहान मुले यांना आवाजाचा प्रचंड त्रास होतो, मिरवणुकीत लेझरचा वापर केल्यास मंडळावर गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा ही पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिला.

जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार यांनी गणेशोत्सव काळात नियम पाळावेत, स्वयंशिस्त राखून विधायक, धार्मिक उपक्रमांनी उत्सव साजरा करावा असे आवाहन केले. गणेश विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरच्या बोनेट वर स्टेज बांधून त्यावर अनेक कार्यकर्ते विचित्र हावभाव करून नृत्य करतात, आपल्याच घरातील महिला मुली हे दृश्य पाहतात हे अशोभनीय आहे. असे प्रकार मंडळांनी टाळावेत असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार यांनी या वेळी केले.

कार्यक्रमाचे नियोजन पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, सहायक पोलीस निरीक्षण ज्ञानेश्वर उदार, आण्णासाहेब देशमुख, भूषण कदम आदींनी केले. आभार सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button