Crime News: जेजुरी: कोळविहिरे येथे भरदिवसा घरफोडी; 4 लाख 85 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज) : जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील कोळविहिरे येथील घाटेमळा परिसरात अज्ञात चोरट्यांनी घराचे पत्र्याचे पान उचकटून घरात प्रवेश करत तब्बल 4 लाख 85 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. घरफोडी झाल्याची तक्रार जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे.
याबाबत जेजुरी पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेतातील काम आटोपून सायंकाळी घरी परतल्यानंतर घराचे पत्र्याचे पान उचकटलेले आणि हुक खाली पडलेला दिसून आला. कपाटाची तपासणी केली असता सोन्याचे दागिने गायब असल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी सोन्याचा गंठन, राणीहार, लेडीज अंगठी, कानातील फुले-वेल आणि कानातील टॉप्स, असा एकूण 4 लाख 85 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला असून या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध जेजुरी पोलीस स्टेशन गु.र.नं- 258/2026 भारतीय न्याय संहिता कायदा कलम 2023 चे कलम 331(1),331(3),305(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
सदरचा अधिक तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई थोरात हे करत आहेत.



