Crime News: शेतकऱ्यांचे साहित्य चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 03 आरोपींना अटक; एकुण 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): गेले काही दिवसांपासुन पुणे ग्रामीण जिल्हामध्ये शेतकऱ्यांचे साहित्य मधील सौर मोटार पंप, ट्रॅक्टर, ट्रॅक्टर ट्रॉली, पिकअप, मोटार पंप केबल वायर तसेच इतर प्रकारच्या चोरीचे प्रमाण वाढले होते. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, तसेच गणेश विरादार, अपर पोलीस अधिक्षक बारामती विभाग, व चैतन्य कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग यांनी वेळावेळी सदर चोरीचे प्रमाण कमी करण्यासाठी काय उपाय योजना कराव्यात तसेच दाखल चोरीचे गुन्हे कसे उघडकीस आणता येतील याबाबत वेळोवेळी तसेच आढावा बैठकीमध्ये देखील सुचना देवुन मार्गदर्शन केले होते. त्याच अनुषंगाने वालचंदनगर पोलीस स्टेशन मधील चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेसाठी आम्ही तपास पथकामधील अंमलदार यांना वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांची माहिती देवुन त्याप्रमाणे गोपनीय बातमीदार व तांत्रिक गोष्टीच्या आधारे तपास करणेबाबत आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने वालचंदनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अंमलदार दाखल चोरीच्या गुन्हयांच्या अनुषंगाने तपास करत असताना पोहवा किर्तीलाल गायकवाड व पोशि गणेश वानकर यांना गोपनीय बातमीदार यांच्याकडुन माहिती मिळाली की, इसम नामे जयदीप नानासो घोळवे व त्याचे इतर दोन साथिदार यांनी मिळून लाकडी, शिंदेवाडी व भवानीनगर परिसरातील शेतकऱ्यांच्या ट्रॉलींची चोरी केलेबाबत माहिती मिळाली. त्याअनुषंगाने सदर इसमांचा शोध घेत असताना इसम नामे जयदीप नानासो घोळवे, मेघराज नानासो ओंबासे, रा. निंबोडी ता. इंदापुर, जि. पुणे हे दोघे भवानीनगर परिसरात फिरत असलेबाबतची माहिती मिळालीनंतर त्यांना भवानीनगर येथे ताब्यात घेवुन वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे आणुन त्यांना विश्वामध्ये घेवन चौकशी केली असता त्यांनी वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीमधुन ट्रॅक्टर, ट्रॅक्टरची ट्रॉली, चार चाकी पिकअप वाहन व मोटार पंप अशा वाहनांची चोरी केल्याची कबुली देत सदर चोऱ्या ही आम्ही दोघे व आमचा साथिदार नामे आकाश विलास शिंदे रा. निंबोडी ता. इंदापुर, जि. पुणे असे मिळुन केल्याचे सांगितले. त्यानंतर वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या अभिलेखाची पाहणी केली असता खालील प्रमाणे ०३ गुन्हे उघडकीस आले असुन चार चाकी पीकअप चोरीबाबत अभिलेख पाहता त्याबाबत अभिलेखाची माहिती मिळुन आली नाही.
१) गु. रजि. नंबर २२५/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२)
२) गु. रजि. नंबर ०५/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२)
३) गु. रजि. नंबर ८१/२०२६ भारतीय न्याय संहित २०२३ चे कलम ३०३(२)
सदर आरोपी नामे १) जयदीप नानासो घोळावे, (वय २२ वर्षे), रा. निंबोडी ता. इंदापुर, जि.पुणे, २) मेघराज नानासो ओंबासे, (वय २२ वर्षे), रा. निंबोडी ता. इंदापुर, जि. पुणे, ३) आकाश विलास शिंदे, (वय २३ वर्षे), रा. निंबोडी ता. इंदापुर, जि. पुणे यांना दाखल गुन्हामध्ये अटक करुन त्यांच्याकडुन वेगवेगळया एक न्यु हॉलंड कंपनीचा ट्रॅक्टर, एक चार चाकी ट्रॉली, एक महिंद्रा कंपनीचे पिकअप व एक सौर मोटार सौरपंप तसेच ट्रॉली चोरी करण्यासाठी वापरलेला ट्रॅक्टर असा सर्व मुद्देमाल तपासकामी जप्त करण्यात आला आहे. तरी सदर गुन्हामधील सर्व जप्त मुद्देमाल हा संबधीत फिर्यादी व शेतकरी यांना देण्याची कार्यवाही चालु असन दाखल गुन्हयाचा तपास अदयाप सुरू आहे.
सदरची कामगिरी ही संदीपसिंह गिल्ल, पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण, गणेश बिरादार, अपर पोलीस अधिक्षक, बारामती विभाग, चैतन्य कदम उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस स्टेशनचे राजकुमार डुणगे सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार किर्तीलाल गायकवाड, अजित थोरात, परिमल माणेर, अजित भाग्यवंत, पोलीस अंमलदार विक्रमसिंह जाधव, गणेश वानकर, अभिजीत कळसकर, राहुल माने यांनी केली आहे. सदर कामगिरी बद्दल वरिष्ठ अधिकारी यांनी वालचंदनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.



