आपला जिल्हा

News: झेंडेवाडी येथील नवीन स्वयंचलित चाचणी केंद्राबाबतची कार्यपद्धती जारी

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने झेंडेवाडी, ता.पुरंदर येथे ५ ऑगस्ट २०२६ पासून नवीन स्वयंचलित चाचणी केंद्र कार्यान्वित करण्यात येत आहे. या केंद्रावर वाहन मालक व वाहन चालक यांनी त्यांच्या वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी पुढीलप्रमाणे कार्यपध्दती अवलंबावी. स्वयंचलित चाचणी केंद्र येथे वाहन फिटनेस तपासणीसाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट कशी घ्यावी, याबाबत सूचना निर्गमित केल्या आहेत.

प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी https://vahan.parivahan.gov.in/AFMS ⁠ या संकेतस्थळावर जावून प्रथम राज्य, जिल्हा व वाहनाचा प्रकार निवडून “View ATS Centre” वर क्लिक करावे. उपलब्ध केंद्रांपैकी इच्छित केंद्र निवडून “Book Appointment” वर क्लिक करावे. उपलब्ध तारीख व वेळ निवडावी. वाहन नोंदणीकृत असलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला OTP टाकून नोंदणी पूर्ण करावी. विहित शुल्क ऑनलाइन भरावे. वाहन नोंदणीवरील मोबाईल क्रमांक अद्ययावत नसल्यास, प्रथम तो अद्ययावत करून घ्यावा.सुरुवातीच्या काळात केंद्रांमध्ये मर्यादित स्लॉट उपलब्ध असतील; काही दिवसांत पूर्ण क्षमतेने सेवा सुरू होईल. वाहन तपासणीसाठी अपॉइंटमेंटनुसार वेळेत वाहन आणावे. वाहनासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे तसेच लागू असल्यास VLTD, SLD आणि Retro Reflective Tape संबंधित कागदपत्रे सोबत आणावीत.

जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांनी वाहन फिटनेस प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट घेऊन नियोजित दिवशी वाहन तपासणीसाठी उपस्थित राहावे. असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button