Crime News: जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत लक्ष्मीनारायण लॉज येथुन 6 महीलांची वैश्या व्यवसायातुन सुटका

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): दिनांक 20/07/2026 रोजी सांयकाळी भुषन माने, परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी, पुणे ग्रामीण व रविंद्र पाटील, प्रभारी अधिकारी जेजुरी पोलीस स्टेशन यांना लक्ष्मीनारायण लॉज येथे काही महीलांकडुन वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची गोपनीय माहीती मिळालेने, जेजुरी पोलीस स्टेशनकडील, सपोनि उदार, पोसई पाटील, पोसई तारडे, मपोसई पवार, सहा. फौजदार ढमाळ, पोहवा खाडे, पोहवा. देशमुख, पोहवा कदम मपोहवा. नांगरे व पोकॉ. गौरव गुजेगावकर, बाळासो कारंडे, लक्ष्मीकांत पांढरे, रोहन शिरगावकर, सोमनाथ माळी, योगेश वाल्हेकर या पथकांनी सदर ठिकाणी बनावट ग्राहक, दोन पंच, याचेसह रात्री 21/00 वा. सुमा जावून छापा टाकून कारवाई केली. त्यामध्ये लॉजचालक रामा नारायण मोगविरा हा मिळुन आला असून, एकुण 6 पिडीत महीला मिळाल्या आहेत.
सदर प्रकरणी आरोपी रामा नारायण मोगविरा याचेवर अनैतिक मानवी वैश्या व्यवसाय प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 3,4,5 अन्वये गुन्हा नोंद करून कारवाई करून त्यास गुन्हयाचे कामी अटक करणेत आली आहे. त्या ठिकाणी मिळून आलेल्या 6 पिडीत महीलांची सुटका करणेत आली आहे.
सदर कारवाई संदीपसिंह गिल, पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, गणेश बिरादार, अपर पोलीस अधिक्षक, बारामती, रांजेद्रसिह गौर, उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड याचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली असुन, सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक, रविद्र पाटील हे करीत आहे.


