क्राईम

Crime News: जेजुरी खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातुन महिलेचा 50 हजार रु.किं. चा सोन्याचा मिनी गंठण लंपास

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी येथे खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने चोरून नेल्याची घटना रविवार (दि. १९) रोजी घडली असून याबाबत फिर्यादी स्वाती अनिल नलवडे (वय ४२ वर्षे), रा. वाडे, ता. जि. सातारा यांनी अज्ञात महिलेविरुद्ध जेजुरी पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे.

याबाबत जेजुरी पोलिस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्वाती नलवडे या रविवार दुपारी श्री खंडोबा मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शन घेत असताना गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात महिलेने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण लबाडीच्या उद्देशाने चोरून नेले. चोरीस गेलेल्या दागिन्यात सोन्याची साखळी व त्यास पॅन्डल असून, त्याचे वजन सुमारे सव्वा तोळे आहे. या सोन्याच्या मिनी गंठणाची अंदाजे किंमत ५० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी जेजुरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा र. क्र. १९२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदररचा अधिक तपास जेजुरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नांदे हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button