क्राईम

Crime News: अवैध अग्निशस्त्र जवळ बाळगुन दहशत निर्माण करणारे तीन आरोपींना ताब्यात घेवुन चार अवैध गावठी पिस्तुल, सहा जिवंत काडतूस असा एकूण 1,19,500/- रू. किंचा मुद्देमाल हस्तगत

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांनी अवैध अग्निशस्त्राचा वापर करून गुन्हे करणारे, अवैध अग्निशस्त्र बाळगणारे अभिलेखावरील आरोपीबाबत विशेष मोहिम राबवून आरोपींचे वाहनांची, राहत्या घरांची कायदेशीररित्या झडती घेवून आक्षेपार्ह चीज वस्तू मिळून आल्यास कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने प्रभावी कारवाई करणेकामी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल पुणे ग्रामीण, यांनी पुणे ग्रामीण पोलीसांना तसेच स्थानिक गुन्हे शाखेला योग्य मागदर्शन करून सुचना केल्या होत्या.

स्थानिक गुन्हे शाखेची तपास पथकांना माननीयांचे आदेशान्वये अवैधरित्या अग्निशस्त्रे, गावठी पिस्तुल बाळगणारे, खरेदी विक्री करणारे, गावठी पिस्तुलचा वापर करून गुन्हे करणारे आरोपीबाबत माहिती घेण्यात येत होती. विशेष मोहिम अंतर्गत कारवाई करण्याचे अनुषंगाने स्था.गु.शा.चे पथक नेमण्यात आली आहेत.

दि.०९/०७/२०२६ रोजी बारामती विभागात कामकाज पाहणारे स्था.गु.शा. चे पथक हे अवैधरित्या अग्निशस्त्रे, गावठी पिस्तुल बाळगणारे, खरेदी- विक्री करणारे, व्यक्तींवर कारवाई करण्याचे अनुषंगाने बारामती परिसरात पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, रुई पाटीजवळ एक इसम अवैध अग्निशस्त्र जवळ बाळगुन उभा आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पथकाने वरिष्ठ अधिकारी यांना गोपनीय बातमीचा मजकूर सांगितला व कारवाईचे आदेश प्राप्त करून घेतले आणि दोन पंचांसह कायदेशीर कारवाई केली असता, आरोपी नामे ओम ऊर्फ लाला राजेंद्र कुदांडे (वय २० वर्षे) रा. भानगाव ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर यास ताब्यात घेण्यात आले, त्याचे अंगझडतीत अवैध रित्या बाळगलेले एक गावठी पिस्तुल, एक जिवंत काडतूस असा एकूण ५०,२००/- रू. किंमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे. सदर प्रकरणी स्वप्निल मदन अहीवळे, पोलीस हवालदार ब.नं. २०५७ नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा यांनी फिर्याद दिली असून बारामती तालुका पो स्टे गुन्हा रजि.नं ३२०/२०२६ भा.ह.का. ३.२५ प्रमाणे गुन्हा नोंदविणेत आलेला आहे.

तसेच दि. १०/०७/२०२६ रोजी इंदापुर पो स्टे हद्दीत स्था.गु.शा.चे पथक पेट्रोलिंग करत असताना पथकास गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, इंदापुर एस.टी स्टैंड जवळ एक इसम अवैध अग्निशस्त्र जवळ बाळगुन दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने उभा आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पथकाने वरिष्ठ अधिकारी यांना गोपनीय बातमीचा मजकूर सांगितला व कारवाईचे आदेश प्राप्त करून घेवून दोन पंचांसह कायदेशीर कारवाई केली असता, आरोपी नामे शाहरुख इस्माईल मुजावर (वय २५ वर्षे) रा. बावडा ता. इंदापुर जि. पुणे यास ताब्यात घेण्यात आले, त्याचे अंगझडतीत अवैध रित्या बाळगलेले दोन गावठी पिस्तुल, चार जिवंत काडतूस असा एकूण ५०,८००/- रू. किंमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे. सदर प्रकरणी गणेश मच्छिद्र डेरे पोलीस कॉस्टेबल ब नं १०२६ नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा यांनी फिर्याद दिली असून इंदापूर पो स्टे गुन्हा रजि.नं. ४२१/२०२६ भा. ह. का. ३.२५ प्रमाणे गुन्हा नोंदविणेत आलेला आहे.

त्याचप्रमाणे दि. १०/०७/२०२६ रोजी यवत परिसरात स्था.गु.शा.चे पथक पेट्रोलिंग करत असताना पथकास गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पाटस गावचे हद्दीतील चांगुना हॉटेल जवळ एक इसम अवैध अग्निशस्त्र जवळ बाळगुन उभा आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पथकाने वरिष्ठ अधिकारी यांना गोपनीय बातमीचा मजकूर सांगितला व कारवाईचे आदेश प्राप्त करून घेवून दोन पंचांसह कायदेशीर कारवाई केली असता, आरोपी नामे सनी कुमार केसरी प्रसाद, (वय २५ वर्षे), रा. डोमणीमउ मोहम्मद पूर नोगवाँ इलाहाबाद राज्य उत्तरप्रदेश यास ताब्यात घेण्यात आले, त्याचे अंगझडतीत अवैध रित्या बाळगलेले एक गावठी पिस्तुल, एक जिवंत काडतूस असा एकूण १८,५००/- रू. किंमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे. सदर प्रकरणी विकास दशरथ कापरे पोलीस हवालदार ब नं २३४४ नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा यांनी फिर्याद दिली असून यवत पो स्टे गुन्हा रजि. नं ७०२/२०२६ भा.ह.का. ३,२५ प्रमाणे गुन्हा नोंदविणेत आलेला आहे.

सदर आरोपीत यांनी सदरचे अवैध गावठी पिस्तुल कोठून आणले आहे, बाळगण्यामागे त्यांचा नेमका कोणता हेतू आहे याकरीता पुढील तपास सुरू असून अटक आरोपीत यांना मा. न्यायालयात हजर करणेत आले आहे.

मागील तीन दिवसांत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी दौंड बारामती उपविभागात अवैध अग्निशस्त्र बाळगणारे व्यक्तींवर कारवाई करत एकूण ०७ गावठी पिस्तुल २१ जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार बारामती विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, बारामती विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, दौंड विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली, स्था.गु.शा. चे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, बारामती तालुका पो स्टे चे पोनि नारायण पवार, इंदापूर पो. स्टे. चे पो.नि. विलास नाळे, यवत पो स्टे चे पो.नि. संतोष तासगावकर, स्था.गु.शा.चे पोसई सुधीर वाळुंज, श्रेणी पोसई बाळासाहेब कारंडे, पोलीस अंमलदार शिवाजी निकम, गुलाब पाटील, किशोर तेलंग, सचिन घाडगे, स्वप्निल अहीवळे, आसिफ शेख, शैलेश स्वामी, गणेश डेरे, सुलतान डांगे, रहीस मुलाणी, तुषार चव्हाण, गुरू गायकवाड, सुभाष राउत, योगेश नागरगोजे, विकास कापरे, यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button