क्राईम

Crime News: पर्यटकांकडून खंडणी मागणाऱ्या गुन्हयात महामार्ग सुरक्षा पोलीस विभागाचे खंडाळा पथकातील पोलीस अंमलदार व सहकारी असे पाच आरोपींना अटक करून कारवाई

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): कामशेत पो स्टे गु.र.नं. १५२/२०२६ बी.एन.एस.१२७(२), १४०(३), ३०८(२), ३५१(२) (३),३५२,३ (५) प्रमाणे दि. ०६/०७/२०२६ रोजी गुन्हा दाखल करणेत आला होता. सदर गुन्हयात दि. ०५/०७/२०२६ रोजी फिर्यादी नामे भुषीत उमेश शर्मा (वय २८ वर्षे) रा. विमाननगर, पुणे व त्यांचे सहकाऱ्यांसह त्यांचेकडील चारचाकी वाहनाने पुणे येथून पर्यटनाकरीता लोणावळा येथे जात होते. दुपारी ०४/३० वा. सुास पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाने लोणावळ्याकडे जाताना मौजे ताजे ता. मावळ, जि. पुणे गावचे हद्दीत अंबर दिवा लावलेल्या झायलो चारचाकी वाहनातील सहा व्यक्तींनी फिर्यादीचे वाहन थांबवून फिर्यादी व त्यांचे सहकारी यांचेकडे अंमली पदार्थ बाळगल्याचा संशय व्यक्त करून कारवाई करण्याची भिती दाखवून रू. ५,००,०००/- खंडणीची मागणी केली. तसेच फिर्यादी व त्यांचे सहकाऱ्यांना आरोपींनी भिती दाखवून तळेगाव दाभाडे परिसरात नेऊन ए.टी.एम. मधून पैसे काढून देण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला असलेबाबत फिर्यादीने महामार्ग सुरक्षा पोलीस विभागाचे अनोळखी सहा व्यक्ती विरोधात फिर्याद नोंदविलेवरून कामशेत पो स्टे येथे वरील प्रमाणे गुन्हा नोंदविणेत आला आहे.

सदर गुन्हयाचा प्रकार गंभीर असल्याने पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, पुणे ग्रामीण यांनी ताबडतोब तपास पथकास सुचना व मार्गदर्शन करून गुन्हयातील आरोपींना अटक करणेचे आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने तपास पथकाने घटनास्थळी भेट देवून तसेच फिर्यादी व साक्षीदार यांचेशी संवाद साधून आरोपीबाबत पुर्णतः माहिती उपलब्ध करून घेतली, त्याचप्रमाणे गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे सदर गुन्हयात महामार्ग सुरक्षा पोलीस विभागाचे खंडाळा पथकात नेमणुकीस व कर्तव्यावर असणारे तीन पोलीस अंमलदार तसेच दोन होमगार्ड व एक वॉर्डन अशा सहा व्यक्तींचा सहभाग असल्याची माहिती निष्पन्न झाली.

उपलब्ध माहितीचे आधारे तपास पथकाने सदर गुन्हयाचे कामी महामार्ग सुरक्षा पोलीस विभागात कर्तव्यावर असणारे पोलीस अंमलदार आरोपी नामे. १) अमोल महादेव ननावरे (वय ३६ वर्षे), (पो.कॉ./२९०१) नेमणूक महामार्ग सुरक्षा पथक खंडाळा पुणे, २) तुषार बाळु ढावरे (वय ३३ वर्षे), (पो.कॉ./३०१४) नेमणूक महामार्ग सुरक्षा पथक खंडाळा पुणे, तसेच होमगार्ड आरोपी नामे ३) तुषार संजय घाडगे (वय ४१ वर्षे), (होमगार्ड सनद क्र. ५२३६), रा. करुंज ता. मावळ जि.पुणे, ४) किसन कोंडीबा बोंबले, (वय ३२ वर्षे), (होमगार्ड सनद क्र. ३०३१) रा. पिंपळोली, ता. मावळ जि. पुणे, वॉर्डन आरोपी नामे ५) नितेश दिपक चव्हाण, (वय ३२ वर्षे), (ट्राफिक वॉर्डन) रा. शिलाटणे ता. मावळ जि.पुणे यांना दि. ०७/०७/२०२६ रोजी अटक करणेत आली आहे. नमुद गुन्हयात पुणे महामार्ग सुरक्षा पोलीस विभागातील पोलीस अंमलदार आरोपी अमोल अशोक वायकर नेमणुक पुणे महामार्ग सुरक्षा पथक खंडाळा याचा देखील सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.

अटक करणेत आलेल्या पाच आरोपींना मा. न्यायालयात हजर केले असता, त्यांची दि. १३/०७/२०२६ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करणेत आली आहे.

सदर गुन्हयाचे तपासादरम्यान महामार्ग सुरक्षा पोलीस दलातील खंडाळा पथकातील तीन पोलीस अंमलदार यांनी त्यांचे इतर तीन सहकारी (होमगार्ड व वॉर्डन) यांचे मदतीने हायवे ट्राफीक चे कर्तव्य बजावित असताना सदरचे गुन्हेगारी कृत्य केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे महामार्ग सुरक्षा पोलीस दलातील खंडाळा पथकातील कर्तव्यावरील दोन पोलीस अंमलदार व त्यांचे इतर तीन सहकारी यांना अटक करणेत आली आहे. महामार्ग सुरक्षा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी पवार, यांनी पाठविलेल्या अहवालावरून गुन्हयातील आरोपी पोलीस अंमलदार यांचेवर निलंबनाची कारवाई करणेत आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button