क्राईम

Crime News: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्याच्या कारवाईत एकूण 1 कोटीहून अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्त : अतुल कानडे

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): राज्य उत्पादन शुल्कच्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईत अंदाजे १ कोटी २० लाख ९६ हजार रुपये किंमतीचा मद्यसाठा, १५ लाख रुपये किंमतीचे वाहन तसेच इतर साहित्य असा एकूण १ कोटी ३५ हजार ९९ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे यांनी दिली आहे.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह-आयुक्त, अंमलबजावणी व दक्षता . प्रसाद सुर्वे तसेच पुणे विभागीय उप आयुक्त सागर धोमकर यांच्या आदेशानुसार गुणात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सी यांनी केलेल्या कारवाईत पुणे-मुंबई महामार्गावरील हवेली तालुक्यातील सुतारवाडी पाषाण एका कंटेनर वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये गोवा राज्यातील विदेशी मद्याचे १ हजार २०० बॉक्स गोवा राज्यात निर्मित झालेली परंतु मध्य प्रदेश राज्यात निर्मित व विक्री असलेल्या बनावट लेबलांचा वापर करून “Royal Select Deluxe Whisky” या बँडचे विदेशी मद्य आढळून आले. वाहनातून १८० मि.ली. क्षमतेच्या बाटल्यांचे एकूण १० हजार ३६८ ब. लि. मद्य जप्त करण्यात आले.

मद्य वाहतुकीसाठी आवश्यक असलेला वैध वाहतूक परवान्याबाबत विचारणा केली असता कोणताही वैध परवाना आढळून आला आहे. त्यांच्याकडे कंट्रोल पॅनेल रिकामे बॉक्सचे बनावट टॅक्स इनव्हाईस अशी खोटी व बनावट कागदपत्रे सादर केली. तसेच वाहतुकीसाठी सादर करण्यात आलेली कागदपत्रेही संशयास्पद व बनावट असल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले.

या गुन्ह्यामध्ये वाहनाचा चालक यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ मधील कलम ६५(अ) (ई), ८०, ८३, ८६, ९० व १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त मद्याचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून, सदर मद्य बनावट असल्याची शक्यता तपासली जात आहे. या कारवाईमध्ये निरीक्षक संदीप कदम आणि त्यांच्या पथकाचा सहभाग होता.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने नागरिकांना अवैध गावठी दारूपासून दूर राहण्याच्या व अशा बेकायदेशीर धंद्यात गुंतलेल्याविषयी माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९ किंवा ०२०-२६९१७३२१ दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button