आपला जिल्हा

News: जेजुरी: देवमळा ग्रामपंचायत सदस्य पदाची आरक्षण सोडत जाहीर

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज देवमळा ग्रामपंचायत सदस्य पदाची बहुप्रतिक्षित आरक्षण सोडत उत्साहात आणि पारदर्शक वातावरणात पार पडली. या सोडतीकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागून राहिले होते. आरक्षण प्रक्रियेमुळे गावातील आगामी राजकीय गणितांमध्ये बदल होण्याची शक्यता निर्माण झाली असून, नव्या चेहऱ्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रक्रिया पारदर्शक- देवमळा येथील सदस्य पदाच्या आरक्षणाची सोडत शासकीय नियमांनुसार आणि अत्यंत पारदर्शक पद्धतीने काढण्यात आली. या महत्त्वपूर्ण प्रक्रियेसाठी अध्यासी अधिकारी म्हणून संजय बदडे (मंडळ अधिकारी) यांनी कामकाज पाहिले. त्यांच्यासोबत ग्रामसेवक पुंडलिक मस्के आणि ग्राम महसूल अधिकारी महेश वाघ उपस्थित होते.

शासकीय नियमावलीचे तंतोतंत पालन करून ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यावेळी संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

आपल्या प्रभागात (वॉर्डात) कोणते आरक्षण जाहीर होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आरक्षण जाहीर होताच काहींच्या चेहऱ्यावर आनंद तर काहींच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव दिसून आले.

देवमळा आरक्षण सोडत खालील प्रमाणे –

प्रभाग 1
१) नागरिकांचा मागास प्रवर्ग – महिला
२) सर्वसाधारण – महिला
3) सर्वसाधारण (खुला प्रवर्ग)

प्रभाग 2
१) अनुसूचित जाती प्रवर्ग – महिला
२) सर्वसाधारण – महिला
३) सर्वसाधारण (खुला प्रवर्ग)

प्रभाग 3
१) नागरिकांचा मागास प्रवर्ग
२) सर्वसाधारण – महिला
३) सर्वसाधारण (खुला प्रवर्ग)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button