Crime News: 24 वर्षापासुन फरार खुनाच्या आरोपीस पोलीसांनी कौशल्याने केले जेरबंद

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): वेल्हे पोलीस स्टेशन गु.र.नं ३२/२००२ भादवि कलम ३०२ प्रमाणे दि. २८/११/२००२ रोजी गुन्हा दाखल केलेला होता. गुन्हयात मयत बाबुराव रामभाउ सरगळे, रा.आंबेगाव खुर्द, ता.राजगड याचे आरोपी सोबत तंबाखु खाणेस मागणेचे कारणावरून वाद होवुन आरोपी याने त्याचे हातातील काठीने मयतास मारहाण करून गंभीर जखमी करून खुन केला असलेबाबत फिर्याद नोंदविलेली होती.
आरोपी हा गुन्हा केल्यापासुन तब्बल २४ वर्षे फरार होता. त्याचे अस्तित्वावद्दल कोणतीही माहिती प्राप्त होत न्हवती. पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्या पोलीस स्टेशन मधील पाहिजे फरार आरोपी शोध घेणेकामी स्वतंत्र पथक नेमुण आरोपी अटक करणेबाबत प्राप्त सुचनेनुसार पोलीस स्टेशन कडील पथकातील सहायक फौजदार प्रदिप कुदळे व पोहवा/२४७८ सोमेश राउत यांना नेमण्यात आले. त्यांनी प्राप्त गोपणीय माहितीच्या आधारे महाड जि. रायगड तालुक्यातील वारंगी, निजामपुर छत्री, वाळण इत्यादी गावांच्या डोंगर दऱ्यांमध्ये आरोपी असल्याबाबत खात्रीशिर माहिती घेवुन वेशभुषा बदलुन लाकुडतोड व्यापारी असल्याचे सांगुन आरोपी यास विश्वासात घेतले. परंतु त्यास संशय आल्याने तो डोंगरात पळून जावु लागला तेव्हा त्यास पाठलाग करून शिताफिने पकडुन जेरबंद करण्यात आले व नजीकच्या पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आले. आरोपी कोणताही मोबाईल आणि ओळख पटु नये याकरीता वेष व नाव बदलुन राहत होता पथकातील पोलीस सहायक फौजदार प्रदिप कुदळे व पोहवा / २४७८ सोमेश राउत यांनी स्थानिक पोलीस पोहवा ढेबे, महाड पोस्टे व पोलीस पाटील यांची मदत घेवुन व आपले कौशल्य व तपासाचे अनुभवाचे जोरावर सदरची कामगिरी पार पाडली. आरोपी कितीही चाणाक्ष असला तरी पोलीसांचे तावडीतुन सुटु शकत नाही हे या निमीत्ताने सिद्ध झाले.
आरोपी हिऱ्या उर्फ हिरामण शिवराम पवार (वय ४३ वर्षे), रा. कलकतवाडी, ता. महाड, जि. रायगड यास ताब्यात घेवुन वेल्हे पोलीस स्टेशन येथे घेवुन आलेनंतर आरोपीस विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्याने गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमित देशमुख हे करीन आहेत.
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक, संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिलकुमार पुजारी यांचे मार्गदर्शनाखाली वेल्हे पोलीस स्टेशन चे सहा पोलीस निरीक्षक किशोर शेवते, सहायक फौजदार प्रदिप कुदळे व पोहवा / २८७८ सोमेश राउत व पोलीस स्टेशन कडील स्टाफ यांनी केली आहे.



